मुंबई: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सुपरहिट करिअर सोडून परदेशात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. ८० आणि ९० च्या दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आता पुन्हा सिनेइंडस्ट्रीत सक्रिय होताना दिसतायत. आता परदेशात स्थायिक झालेल्या लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या मायभूमीत परतल्या आहेत. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सक्रीय होण्यासाठी त्या सज्ज आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप त्यांना हव्या तशा प्रभावी अशा भूमिकांच्या ऑफर्स मिळाल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मीनाक्षी शेषाद्री यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, माझ्या इंस्टाग्राम परिवारातील सर्व सदस्यांना सस्नेह नमस्कार. आज मला तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानायचे आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर मी माझी ‘कर्मभूमी’ मुंबई, भारतात परतले आहे. अत्यंत आशा, सकारात्मकता आणि ऊर्जेनं मी पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकत आहे.
चित्रपटसृष्टीपासून इतकी वर्षे दूर राहिल्यानंतरही चाहत्यांनी दिलेलं प्रेम हेच आपल्या या नवीन प्रवासाचं मुख्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या कमबॅकविषयी बोलताना मीनाक्षी यांनी स्पष्ट केलं की, त्यांना फक्त पडद्यावर दिसण्यासाठी कोणतीही भूमिका करायची नाहीये. त्यांना अशा भूमिका हव्या आहेत ज्या त्यांच्यातील कलाकाराला आव्हान देतील. त्यांचा काही तरी प्रभाव पडू शकतो.
त्या म्हणाल्या की, मी OTT प्लॅटफॉर्म किंवा चित्रपट, अशा दोन्ही माध्यमांवर काम करण्यास उत्सुक आहे. भूमिका मुख्य असो, साहाय्यक असो किंवा एखाद्या छोट्या शोमधील असो, ती प्रभाव पाडणारी असणं गरजेचं आहे. मला आता अशा भूमिका करायच्या आहेत ज्या माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअरला एक नवीन दिशा देतील.
तसंच मला काही ऑफर्स नक्कीच आल्या, पण त्या मला इतक्या प्रभावशाली, अर्थपूर्ण वाटल्या नव्हत्या. तर काही प्रोजेक्ट्स तांत्रिक कारणांमुळं प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. मी कोणत्याही पीआर एजन्सी किंवा मॅनेजरशिवाय स्वतःच माझा हा प्रवास सांभाळत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
स्टारडमसाठी नव्हे, तर आनंदासाठी पुनरागमन आपल्या लग्नानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर मीनाक्षी अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. आता मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या अमेरिकेतील बोस्टन येथे आपल्या मुलाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभासाठी गेल्या असून, लवकरच त्या मुंबईत पूर्णवेळ कामाला सुरुवात करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलंय.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा