प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना ‘दे धक्का’; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ


चंद्रपूर : विदर्भात काँग्रेसने मोठ्या संख्येने नगरसेवक जिंकलेली महापालिका म्हणजे चंद्रपूर (Chandrapur). मात्र, निवडणुकीपासून येथील महापालिकेत काँग्रेसमध्येच (Congress) दोन गट पडल्याचं दिसून आलं. त्यातच, आता खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) यांच्याकडून काँग्रेस नेते आ.विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या मनपा नगरसेवकांच्या गटनेते पदाबाबत नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला. मनपातील वडेट्टीवार गटाच्या राजेश अडडूर यांना हटवून सुरेंद्र अडबाले यांना नवे गटनेतेपदी नियुक्ती देण्यात आली आही. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील राजकीय नाट्यावर पडदा पडला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांना मागे सारत हा डाव जिंकला. 

चंद्रपूर महापालिकेतील निवडीवरुन काँग्रेसमध्य दोन गट पडले होते. त्यावेळी, खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात राजकीय वाद जुंपला होता. अखेर दिल्ली दरबारी हा वाद संपुष्टात आल्यानंतर चंद्रपूर मनपा सत्ता स्थापनेच्या वेळेस विजय वडेट्टीवार गटाच्या राजेश अडडूर यांना फेब्रुवारी महिन्यात गटनेतेपद देण्यात आले होते गटनेता, मात्र वडेट्टीवार गटाचे 6 नगरसेवक नुकतेच खा. धानोरकर गटात गेल्यानंतर अडडूर यांच्या हकालपट्टीसाठी बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे 27 पैकी बहुमताच्या 16 नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत सुरेंद्र अडबाले यांना गटनेता म्हणून निवडल्याचे निश्चित केले. त्यानुसार, नागपूर विभागीय आयुक्तांनी निर्णय देत सुरेंद्र अडबाले यांना गटनेता म्हणून घोषित केले. सुरेंद्र अडबाले हे विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांचे सख्खे लहान बंधू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात आ. वडेट्टीवार विरुद्ध खा. धानोरकर संघर्ष टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. आता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गटाला मोठा धक्का

राजेश अड्डूर यांना काही दिवसांपूर्वी गटनेतेपदावरून पायऊतार व्हावे लागले होते, सुरेंद्र अडबाले नवे गटनेते, 16 नगरसेवकांच्या बहुमताने सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात आली. अडबाले हे प्रतिभा धानोरकर समर्थक असून चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतृत्वात मोठा बदल करण्यात आल्याने राजकीय वादंग उठलं आहे. काँग्रेसच्या 27 पैकी 16 नगरसेवक अडबाले यांच्या पाठीशी असून विभागीय आयुक्तांकडून सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत राजेश अड्डूर यांना सुनावले. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देताना गटनेता ‘नेता निवडला जातो, थोपवला जात नाही म्हणत आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत राजेश अड्डूर यांची गटनेता म्हणून नोंदणी रद्द करण्यात आली होती. 

हेही वाचा

Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *