वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघांने 14 जूनला पाकिस्तानचा धुव्वा उडवून वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर आज टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान आहे. स्पर्धेतील या दहाव्या सामन्याचं आयोजन हे हेडिंग्ले लीड्समध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. नेदरलँड्सच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन बॅबेट डी लीडे हीने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. महिला ब्रिगेड किती धावा करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा.
नेदरलँड्स वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : हेदर सीजर्स, फेबे मोल्केनबोअर, बॅबेट डी लीडे (कर्णधार आणि विकेटकीपर), स्टेरे कॅलिस, रॉबिन रिजके, फ्रेडरिक ओव्हरडाइक, आयरिस झविलिंग, मिर्थे व्हॅन डेन रॅड, कॅरोलिन डी लँगे, सिल्व्हर सीजर्स आणि इसाबेल वोनिंग.
URL : indw vs nedw playing xi india vs netherlands today 10th womens t20 world cup 2026 match playing 11 details with name in marathi
Keywords : Womens T20 World Cup, ICC Womens T20 World Cup 2026, india Playing XI, Netherlands Playing XI, INDW vs NEDW Playing XI, INDW vs NEDW Confirmed Playing XI, live cricket match, cricket score online, today cricket score,
Excerpt : ICC Womens T20 World Cup India vs Netherlands In Marathi Playing XI : विजयानंतर दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र भारतीय संघाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. जाणून घ्या कुणाला संधी देण्यात आली आहे.
PHOTO : INDW vs NEDW Toss (Bcci Women X Account)