NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौर पद देण्याची मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी म्हटलं आहे. सध्या पुणे मानपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे. राज्यात आम्ही सत्तेत आहोत तर मग पुणे महापालिकेत देखील…