शेतकऱ्यांना मिळणार प्राचीन शेतीविषयक धडे, पुण्यातील संस्थेने विकसित केला खास अभ्यासक्रम, Video | मराठी बातम्या (Latest Marathi News)


Last Updated:

प्राचीन भारतीय कृषी परंपरेचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त ज्ञान आजच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने भांडारकर संशोधन संस्थेने प्राचीन भारतीय कृषी पद्धती या विषयावर विशेष अभ्यासक्रम विकसित केला आहे.

+

News18

News18

पुणे : प्राचीन काळात शेती कशी केली जात होती, त्याकाळात कोणत्या कृषी पद्धतींचा वापर केला जात होता, याचा अभ्यास आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. प्राचीन भारतीय कृषी परंपरेचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त ज्ञान आजच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने भांडारकर संशोधन संस्थेने प्राचीन भारतीय कृषी पद्धती या विषयावर विशेष अभ्यासक्रम विकसित केला आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या शेतीच्या पद्धती, पीक व्यवस्थापन, मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन, नैसर्गिक खतांचा वापर तसेच शाश्वत शेतीच्या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातून करण्यात येणार आहे.याविषयीची माहिती डॉ. गौरी मोघे यांनी लोकल 18 ला दिली आहे.

प्राचीन भारतातील कृषी परंपरा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

डॉ. गौरी मोघे यांनी सांगितले की, भांडारकर संस्थेकडून भारत विद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विविध विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. आता याच प्लॅटफॉर्मवर प्राचीन भारतातील कृषी पद्धतीवर आधारित अभ्यासक्रमही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमातून प्राचीन काळात शेती कशी केली जात होती, मातीची सुपीकता कशी टिकवली जात होती, तसेच पारंपरिक कृषी तंत्रांचा वापर कसा केला जात होता, याची माहिती दिली जाणार आहे.

आधुनिक शेतीसोबत प्राचीन ज्ञानाची सांगड घालून शेतकऱ्यांना अधिक शाश्वत शेती करता यावी, हा या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त सहकार्याने हा अभ्यासक्रम विकसित केला असून, कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आणि मनोज एरंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

प्राचीन भारतीय कृषी पद्धतीवर आधारित देशातील हा पहिलाच ऑनलाइन अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.हा अभ्यासक्रम येत्या काही महिन्यांत भारत विद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून, अत्यंत अल्प शुल्कात शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे विविध विषयांवरील ऑनलाइन अभ्यासक्रम सातत्याने सुरू आहेत. इच्छुक शेतकरी आणि अभ्यासकांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *