मुंबई : मुंबईसह देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. याची जबाबदारी बीएलओ म्हणून शिक्षकांवर देखील देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांवर कामाचा (SIR Mumbai Crime) प्रचंड ताण आला आहे. या एसआयआर नोंदणी कामाला कंटाळून घाटकोपरच्या असल्फा विभागात असलेल्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उमा महेश त्रिलोटकर असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांनी वारंवार आपले पती आजारी असल्याने, तसेच कामाचा तणाव असल्याने आपल्याला हे काम शक्य नाही असे प्रशासनाला कळवले होते.मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी शाळेतच हे टोकाचे पाऊल (SIR Mumbai Crime) उचलले आहे. सध्या त्यांच्यावर विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.मात्र याकामामुळे आपल्यावर तणाव आल्याने आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.(SIR Mumbai Crime)
शाळेचे काम सांभाळतानाच एसआयआर मोहिमेच्या कामासाठी सातत्याने दबाव
खासगी अनुदानित शाळेत २३ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षिकेने काल (सोमवारी, ता १३) दुपारी शाळेतच झोपेच्या आठ गोळ्या घेतल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शाळेचे काम सांभाळतानाच एसआयआर मोहिमेच्या कामासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. रात्री उशिरापर्यंत फोन, संदेश, एफआयआरची धमकी तसेच मानसिक छळामुळे त्या तणावाखाली होत्या. शिक्षिकेचे पतीने सांगितले की, सकाळपासून त्या कामामुळे अस्वस्थ होत्या. (SIR Mumbai Crime)
दुपारी शाळेतच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या. याबाबत माहिती मिळताच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुट्टी मिळाली नाही. उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याआधीच सांगितले होते, की अत्यंत गंभीर आजारी आणि अत्यंत गंभीर संकटात असलेल्या शिक्षकांना अशा कामातून काही काळ वगळावे. त्यातच माझा अलीकडेच अपघात झाला होता. त्यामुळे माझ्या देखभालीसाठी पत्नीला सुट्टी द्यायला हवी होती. मात्र, त्यांना सुट्टी दिली गेली नाही, तसेच तिला विविध प्रकारच्या मानसिक छळाचाही सामना करावा लागला, असा आरोप शिक्षिकेच्या पतीने केला आहे, अशी माहिती एका मराठी वृत्तसंस्थेने दिली आहे, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.