Urfi javed Slams Adnan Shaikh youtuber: सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने बऱ्याचदा महिलांविरोधात (Adnan Sheikh) केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानांवर संताप व्यक्त केला आहे. सध्या प्रसिद्ध युट्यूबर अदनान शेख याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यानं घटस्फोटीत महिला आणि विधवा महिलांवर वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांकडून सडकून टीका तर होतच आहे, पण त्यासह उर्फी जावेदनेही त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. अदनान शेख नेमकं काय म्हणाला? उर्फी जावेद त्याच्यावर का बरसली? जाणून घेऊयात.
विधवा आणि घटस्फोटीत महिलांवर अदनान शेख नेमकं काय म्हणाला? (Urfi javed Slams Adnan Shaikh youtuber Over public property remark)
नुकतेच रिलीज झालेल्या एका पॉडकास्टमध्ये अदनान शेखने विधना महिला आणि घटस्फोटीत महिलांवर भाष्य केलं आहे. विधवा आणि घटस्फोटीत महिलांच्या पुनर्विवाहावर त्याने आपले मत व्यक्त केले आहे. अदनान म्हणाला, ‘सोसायची अशा महिलांना पुन्हा लग्न करण्यास परवानगी देत नाहीत. केवळ त्यांनी पुनर्विवाह केला नाही, म्हणून तिला ‘पब्लिक प्रॉपर्टी’ बनू देणं योग्य आहे का? जर एखादा पुरुष अशा स्त्रीशी विवाह करण्यास तयार असेल तर, त्यात काय हरकत आहे?’ असं अदनान शेख म्हणाला.
अदनानने आपल्या व्हिडीओत ‘पब्लिक प्रॉपर्टी’चा उल्लेख केल्यामुळे त्याच्यावर टीकेचा पाऊस पडत आहे. त्याने केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. अदनान शेखच्या विधानावर उर्फी जावेदनं प्रतिक्रिया दिली. तसेच संताप व्यक्त केला. उर्फी जावेद आपल्या तिखट शब्दांत म्हणाली की, ‘अशा लोकांना बोलण्याची संधी का दिली जाते?’. उर्फीने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अनेक नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्याचे समर्थन दर्शवलं. महिलांबाबतीत बोलताना अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणे चुकीचं असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उर्फी जावेदनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सोशल मीडियात अदनानचा व्हिडीओ व्हायरल होत असून, उर्फीसह नेटकऱ्यांनीही त्याला धारेवर धरलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव