AUSW vs INDW Toss : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार? – Marathi News | ausw vs indw icc womens t20i world cup india won toss and elected batting against australia in do or die match at lords


आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30व्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. वुमन्स टीम इंडियाची या मैदानात टी 20i सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता महिला ब्रिगेड कांगारुंसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाकडे शेवटची संधी

टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा आहे. भारताने आतापर्यंत साखळी फेरीत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवण्यासाठी भारताला तगडं आव्हान ठेवावं लागणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आता 20 ओव्हरमध्ये किती धावा जोडण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड.

ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वॉल, फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गर्थ आणि लुसी हॅमिल्टन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *