India A T20 tour of Nepal : BCCIचा मोठा निर्णय! डिसेंबरमध्ये टीम इंडियाचा नेपाळ दौरा; टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा अन् सर्वकाही


India A T20 tour of Nepal : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) यांनी द्विपक्षीय क्रिकेट संबंधांना आणखी बळ देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार इंडिया ए संघ यंदाच्या डिसेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. शुक्रवारी CAN ने अधिकृत निवेदन जारी करत या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

CAN चे अध्यक्ष चतुर बहादूर चंद, सचिव पारस खडका आणि BCCI सचिव देवजीत सैकिया यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्व सामने नेपाळमधील कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या टीयू इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत.

भारत विरुद्ध नेपाळ ‘इंडिया ए’ टी-20 मालिकेचं वेळापत्रक

9 डिसेंबर – पहिला टी-20
11 डिसेंबर – दुसरा टी-20
13 डिसेंबर – तिसरा टी-20

नेपाळसाठी सुवर्णसंधी

ही मालिका नेपाळ क्रिकेटसाठी मोठी संधी मानली जात आहे. ‘इंडिया ए’ संघात आयपीएलमध्ये चमक दाखवणारे अनेक युवा खेळाडू तसेच भारतीय वरिष्ठ संघासाठी खेळलेले काही अनुभवी क्रिकेटपटूही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचा मौल्यवान अनुभव मिळणार आहे.

नेपाळची सातत्याने होत असलेली प्रगती

गेल्या काही वर्षांत नेपाळ क्रिकेटने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती केली आहे. सलग दोन टी-20 विश्वचषकांसाठी पात्र ठरलेल्या नेपाळने 2024 च्या स्पर्धेत विजय मिळवता आला नव्हता. मात्र, 2026 च्या टी-20 विश्वचषकात त्यांनी दमदार पुनरागमन करत स्कॉटलंडचा पराभव केला. इतकंच नाही, तर इंग्लंडसारख्या बलाढ्य संघालाही त्यांनी कडवी झुंज दिली. अत्यंत रोमांचक सामन्यात नेपाळला केवळ 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, पण त्यांच्या कामगिरीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

युवा खेळाडूंना मोठी संधी

डिसेंबरमध्ये होणारी ही मालिका भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वातावरणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, तर नेपाळला बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळून आगामी मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे.

हे ही वाचा –

Team India Coaching Staff : टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *