Argentina vs England : मेसीने 7 मिनिटात फिरवला गेम, एकही गोल न करता मॅचमध्ये बनला स्टार, अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक – Marathi News | Lionel messi argentina reached in fifa world cup 2026 final after beating england in semifinal


Argentina in FIFA World Cup 2026 FinalImage Credit source: Buda Mendes/Getty Images

फिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच रंगतदार झाला. लियोनेल मेसी मोठा खेळाडू का आहे? त्याने आपला क्लास या महत्वाच्या सामन्यात दाखवून दिला. लियोनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने इंग्लंडला नमवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. अर्जेंटिनाच्या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एकवेळ असं वाटलं की, इंग्लंडने फायनलचं तिकिट पक्कं केलय. पण मॅचच्या शेवटच्या 7 मिनिटाने गतविजेत्या अर्जेंटिनाने सिद्ध केलं की, ते चॅम्पियन का आहेत. लियोनेल मेसीने या सामन्यात एकही गोल झळकवला नाही. पण त्याच्या दोन जादुई पासच्या बळावर अर्जेंटिनाने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला. आता रविवारी न्यू जर्सी येथे वर्ल्ड कप किताबासाठी अर्जेंटिना आणि स्पेनची टीम भिडेल.

मर्सिडीज-बेंज स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. सामना सुरु झाल्यानंतर स्टेडियममध्ये दोन्ही बाजूच्या फॅन्सचा गोंगाट होता. मैदानावर तणाव पहायला मिळाला. पहिल्या हाफमध्ये बहुतांशवेळा फाऊल झाले. तिसऱ्या मिनिटाला एंजो फर्नांडेजच्या एका फाऊलनंतर खेळाडूंमध्ये मैदानात वादावादी झाली. इंग्लंडची टीम लियोनेल मेसीला मुक्तपणे खेळू देत नव्हती. त्याला ब्लॉक करुन ठेवण्यात आलेलं. अर्जेंटिनाच्या मार्टिनेज आणि इंग्लंडच्या इलियट अँडरसनला यलो कार्डही मिळालं. पहिला हाफ गोल शून्य बरोबरीत सुटला.

‘गॉड ऑफ फुटबॉल’ लियोनेल मेसीने कमान संभाळली

दुसऱ्याहाफमध्ये चित्र बदललं. 55 व्या मिनिटाला इंग्लंडच्या मोर्गन रोजर्सने जादुई पास दिला. त्यावर अँथनी गॉर्डनने शानदार फिनिशिंग करत चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. इंग्लंडला 1-0 ची आघाडी मिळाली. त्यानंतर अर्जेंटिनाची टीम दबावाखाली होती. इंग्लंडचा विजय निश्चित वाटत होता. अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा धीर सुटत चाललेला. त्यावेळी ‘गॉड ऑफ फुटबॉल’ लियोनेल मेसीने कमान संभाळली. 85 व्या मिनिटाला मेसीने डिफेंडर्सना चकवून एंजो फर्नांडेजकडे पास दिला. फर्नांडेज बॉक्सच्या बरोबर बाहेरुन बुलेट शॉट मारून स्कोर 1-1 केला.

अवघ्या सात मिनिटात गेम फिरवला 

सामना एक्स्ट्रा टाइमच्या दिशेने जात होता. त्याचचवेळी इंजरी टाइममध्ये मेसीने एक अचूक पास दिला. त्यावर लाउतारो मार्टिनेजने कुठलीही चूक न करता तो पास गोलमध्ये बदलला. अवघ्या सात मिनिटात अर्जेंटिनाची टीम मेसीमुळे 1-0 वरुन 2-1 वर पोहोचली. नंतर ही आघाडी टिकवून ठेवत त्यांनी दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *