Sachin Ahir: महायुतीत शासकीय बंगल्यांवरून हायव्होल्टेज ड्रामा! ‘त्या’ एका फ्लॅटमुळे बड्या नेत्यामध्ये प्रचंड नाराजी? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Mahayuti : महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये सध्या सत्ता आणि पदांसोबतच शासकीय बंगल्यांच्या वाटपावरूनही मोठी चढाओढ सुरू असल्याचे समोर आले आहे.

महायुतीत शासकीय बंगल्यांवरून हायव्होल्टेज ड्रामा! 'त्या' एका फ्लॅटमुळे बड्या नेत्यामध्ये प्रचंड नाराजी?
महायुतीत शासकीय बंगल्यांवरून हायव्होल्टेज ड्रामा! ‘त्या’ एका फ्लॅटमुळे बड्या नेत्यामध्ये प्रचंड नाराजी?

मुंबई: महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये सध्या सत्ता आणि पदांसोबतच शासकीय बंगल्यांच्या वाटपावरूनही मोठी चढाओढ सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगल्याचे वाटप करताना एकामागून एक दोन मोठे धक्के बसले आहेत. दोन प्रतिष्ठित बंगल्यांचे वाटप रद्द झाल्यामुळे अखेर अहिर यांच्या पदरी एक फ्लॅट पडला आहे. त्यामुळे महायुतीमधील आमदारांमध्ये आणि नेत्यांमध्ये बंगल्यांसाठी ओढाताण सुरू असल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपसभापती झाल्यानंतर सचिन अहिर यांना सुरुवातीला मंत्रालयासमोर असलेला ‘रायगड’ (A-6) हा बंगला मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा बंगला सध्या राज्याचे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आणि अहिर यांचे हे वाटप तडकाफडकी रद्द करण्यात आले.

यानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या ताब्यात असलेल्या ‘पुरंदर’ (C-3) या बंगल्यावर आपला दावा सांगितला होता. पण तिथेही महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमुळे ट्विस्ट आला. विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही याच बंगल्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. अखेर हा पुरंदर बंगला अण्णा बनसोडे यांना बहाल करण्यात आला, ज्यामुळे अहिर यांना दुसऱ्यांदा हुलकावणी मिळाली.

दोन-दोन बंगल्यांवरून पत्ता कट झाल्यानंतर आता प्रशासनाने सचिन अहिर यांना चर्चगेट येथील ‘सुनीती’ इमारतीमधील एक सदनिका (फ्लॅट) राहण्यासाठी दिली आहे. मात्र, बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे नाराज असलेल्या सचिन अहिर यांनी या सदनिकेत अद्याप राहण्यास जाणे टाळले आहे. या सर्व प्रकारामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये शासकीय बंगल्यांवरून पडद्यामागे नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Sachin Ahir: महायुतीत शासकीय बंगल्यांवरून हायव्होल्टेज ड्रामा! ‘त्या’ एका फ्लॅटमुळे बड्या नेत्यामध्ये प्रचंड नाराजी?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *