Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या ‘रामायण’बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट


Ramayana Trailer Gets U Certificate: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayanam) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यास आता काहीच दिवस उरलेत आणि चाहते त्याबद्दल प्रचंड उत्सुक आहेत. 15 जुलै रोजी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं (CBFC) या ट्रेलरला मंजुरी देत ​​’U’ प्रमाणपत्र दिलंय. सिनेमाच्या प्रदर्शनाला अजून तीन महिन्यांहून अधिक कालावधी बाकी असल्यानं, अनेकांना वाटू शकतं की, हा ट्रेलर एखादा छोटासा ‘प्रोमो’ असेल, जो साधारणपणे अडीच किंवा तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा असतो. पण, तसं नाही, हा ट्रेलर 4 मिनिटं 15 सेकंदांचा असणार आहे. 

CBFC च्या संकेतस्थळावर ‘रामायणम’ ट्रेलरच्या दोन एन्ट्री दिसून येतात. एक ‘Trailer – Ramayan 3D’ आणि दुसरी ‘Theatrical Trailer – Ramayan 3D’. पहिल्या ट्रेलरचा कालावधी 4 मिनिटं 15 सेकंदांचा आहे, तर दुसऱ्याचा कालावधी 4 मिनिटांचा आहे. आता यापैकी कोणतंच वर्जन डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केली जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

‘रामायणम’च्या निर्मात्यांनी सादर केलेली ही तिसरी झलक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 3 जुलै रोजी सिनेमाची एक इंट्रोडक्टरी क्लिप प्रदर्शित करण्यात आली होती. या वर्षी हनुमान जयंतीच्या (2 एप्रिल) निमित्तानं, निर्मात्यांनी ‘राम’ नावाचा टीझर रिलीज केलेला, ज्यामध्ये रणबीर कपूरनं साकारलेल्या प्रभू श्रीरामांच्या रूपावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. 2 मिनिटं 38 सेकंदांच्या या ‘राम’ टीझरला ‘यू’ (U) प्रमाणपत्रही मिळालं होतं. आता सर्वजण या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

‘रामायणम’मध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, सनी देओल हनुमानजींच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘दंगल’ (2016) साठी ओळखले जाणारे नितेश तिवारी करत आहेत आणि निर्मिती नमित मल्होत्रा ​​करत आहेत. सिनेमाचं संगीत ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी दिलंय. हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित केला जाईल. पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. या सिनेमाचं बजेट 4000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

4000 Crore Ramayana Scene Leaked: 4000 कोटींच्या ‘रामायण’च्या मेकर्सचा मोठा निष्काळजीपणा? सिनेमातला महत्त्वाचा सीन लीक झाल्यानं खळबळ, VIDEO





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *