Sohail Khan On His Son Nirvaan Name : अभिनेता सलमान खान याचे कुटु्ंबिय फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. खान कुटुंबाने इंडस्ट्री अनेक कलाकार दिले आहेत. अशात अभिनेता सोहेल खान याने मुलाच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोहेल खान आणि पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान तर छोट्या मुलाचं नाव योहान खान असं आहे. आता नुकताच, सोहेल याने सांगितल्यानुसार, अभिनेत्याला मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान नाही तर ‘राम खान’ असं ठेवायचं होतं. पण असं काही झालं की, सोहेल याला मोठ्या मुलाचं नाव राम ठेवता आलं नाही.
सोहेल सध्या ‘प्राइम व्हिडिओ’च्या ‘अलायन्स’ (Alliance) या रिअॅलिटी शोचा भाग आहे. त्याची पूर्व पत्नी सीमा देखील या शोमध्ये सहभागी आहे. याच शोदरम्यान सोहेलने निर्वाणबद्दल भाष्य केलं. अभिनेता अली गोनी यानं म्हटलं, “तुझी मुलं खूप सुसंस्कृत आहेत. तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच दिसतो.” यानंतर सोहेलने निर्वाणविषयी अधिक माहिती दिली.
काय म्हणाला सोहेल खान?
सोहेल खान, अली याला सांगतो, ‘जेव्हा सीमा प्रेग्नेंट होती आणि निर्वाण याचा जन्म होणार होता, तेव्हा विनोदी अंदाजात आम्ही निर्णय घेतलेला की, मुलगी झाली तर तिचं नाव सीमा ठेवेल आणि मुलगा झाला तर त्याचं नाव मी ठेवणार. माझ्या माझ्या मोठ्या मुलाचं नाव राम असं ठेवायचं होतं, राम खान…’
सोहेल पुढे म्हणतो, ‘जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, मुलगा झाला आहे. मी सीमाला भेटण्यासाठी गेलो, तेव्हा सीमाने मला विचारलं ”निर्वाण’ नाव असं राहील. तेव्हा मी विचार केला, सीमाने आधीच नाव ठरवलं आहे. तिच्या तोंडून त्यावेळी निर्वाण असं नाव निघालं आणि मी देखील ते नाव बदण्याचा कधी विचार केला नाही…’ असं देखील सोहेल म्हणाला.
लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा याचा घटस्फोट
सोहेल आणि सीमा यांनी 1998 मध्ये कुटुंबियांच्या विरोधात जात लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांच्या नात्यातील दुरावा कमी झाला नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर म्हणजे 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघे देखील त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. मुलांबद्दल सांगायचं झालं तर, मिळालेल्या माहितीनुसार, निर्वाण एक 1 BHK मध्ये राहतो, तर लहान मुलगा आईसोबत राहतो. पण अनेकांदा दोघांना वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.