Amavasya 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 14 जुलै 2026, निज ज्येष्ठ अमावस्या असून, हा दिवस अत्यंत खास आहे. ही अमावस्या भौमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. कारण मंगळवारी येणाऱ्या अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पितृतर्पण, दान, स्नान, हनुमान आणि शिवपूजा तसेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे., धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी येणाऱ्या अमावस्येला ‘भौमवती अमावस्या’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी, पितृतर्पण, दान, स्नान, हनुमान आणि शिवपूजा तसेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
मराठी दिनदर्शिकेनुसार भौमवती अमावस्या तिथी (Bhaumvati Amavasya 2026)
- अमावस्या: मंगळवार, 14 जुलै 2026
- अमावस्या तिथी प्रारंभ: 13 जुलै 2026, सायंकाळी 6:50
- अमावस्या तिथी समाप्त: 14 जुलै 2026, दुपारी 3:12
- उदयतिथीनुसार आज निज ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी आल्यामुळे तिला भौमवती अमावस्या असे म्हणतात
भौमवती अमावस्या शुभ योग (Amavasya Shubh Yog)
14 जुलै 2026 रोजी अनेक शुभ ग्रहस्थितींचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
सिद्धी योग (काही काळ)
पुष्य नक्षत्राचा प्रभाव
स्नान-दान, जप, शिवपूजा आणि पितृतर्पणासाठी शुभ काळ.
आज मंगळवार असल्याने भौमवती अमावस्येचे महत्त्व वाढले…
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवार हा भगवान हनुमान तसेच भगवान गणेशांना समर्पित आहे. जेव्हा अमावस्या मंगळवारी येते, तेव्हा तिचे महत्त्व वाढते. असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेश आणि हनुमानांची पूजा केल्याने भीती, दुःख आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते. तसेच यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात शांतता, आनंद टिकून राहतो. भौमवती अमावस्येच्या दिवशी, म्हणजेच आज, सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर, आपल्या पूजास्थानी भगवान हनुमानाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा आणि धूप लावा. त्यांना कुंकू, लाल फुले, गूळ आणि हरभरा अर्पण करा. यानंतर, भक्तिभावाने हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड यांचे पठण करा. शेवटी, हनुमानाची आरती करा आणि कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी पूर्वजांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र, फळे किंवा दक्षिणा दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांचा शाप शांत होतो आणि कुटुंबाला पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो.
भौमवती अमावस्या 14 जुलै 2026 : भाग्यशाली राशी (Lucky Zodiac Signs)
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, भौमवती अमावस्येच्या शुभ प्रभावामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तर व्यावसायिकांना नवीन करार किंवा ग्राहक मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीबाबतही सकारात्मक संकेत मिळू शकतात.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असून, आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. नोकरीत बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासातूनही लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीसाठी भौमवती अमावस्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागू शकते. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मनःशांती लाभेल.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, तर व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्य सुधारेल आणि मानसिक तणाव कमी होईल. देवदर्शन, दान आणि जप-तप केल्याने आत्मविश्वास वाढेल.
अमावस्येच्या दिवशी काय करावे? (ज्योतिषीय उपाय)
- पहाटे पवित्र स्नान करून शिवलिंगावर जलाभिषेक करावा.
- हनुमान चालीसाचे किंवा सुंदरकांडाचे पठण करावे.
- काळे तीळ, उडीद, अन्न किंवा वस्त्रदान करावे.
- पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा घालाव्यात.
- पितरांसाठी तर्पण करून त्यांचे स्मरण करावे.
हेही वाचा :
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)