Aamir Khans Wedding Ceremony: धो – धो कोसळणाऱ्या पावसात आमिर खानने आपल्या राहत्या घरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बी – टाऊनमध्ये दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर दोघांचा अगदी साध्या आणि खासगी पद्धतीने लग्न सोहळा आमिरच्या वांद्रे येथील निवासस्थानी पार पडला. या लग्न सोहळ्यात सिनेइंडस्ट्री, स्पोर्ट्स, बिझनेस आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात अंबानी कुटुंब देखील उपस्थित होते. दरम्यान, अंबानी कुटुंब आमिरच्या लग्नासाठी पोहचत असतानाच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर झाड कोसळलं होतं.
मुसळधार पावसात आमिर खान अन् गौरीचे लग्न झाले (Aamir Khan Gauri Spratt wedding)
आमिर खानच्या लग्नाला अंबानी कुटुंबालाही आमंत्रण देण्यात आलं होतं. अंबानी कुटुंब आमिर खानच्या लग्नाला उपस्थित होण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी येथे पोहोचली होती. दरम्यान, धो धो पावसामुळे अंबानींच्या ताफ्यासमोरच झाड कोसळले असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आमिर खानच्या घरी प्रस्थान करण्यापूर्वी अंबानी कुटुंबाचा ताफा काही काळ थांबवण्यात आला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यानंतर अंबानी कुटुंब सुखरुपपणे आमिर खानच्या घरी पोहोचले.
आमिर खानच्या लग्नाला कोण कोण आलं होतं?
या लग्न सोहळ्यात उद्योगपती मुकेश अंबानी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, रिया चक्रवर्ती, आमिर खानची मुलगी इरा खान, आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान, एली अवराम, राजकुमार हिरानी यांसारखे दिग्गज लोक उपस्थित होते. या लग्नसोहळ्यातील फोटोस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
आमिर आणि गौरीच्या या लग्नसोहळ्यात 70 ते 80 अतिशय जवळच्या मित्र आणि कुटुंबांना आमंत्रित केले असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह त्यांची पत्नी सुनीता देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. आमिर आणि गौरी या दोघांमध्ये साधारण 13-14 वर्षांचे अंतर असू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या: