Bhiwandi : भिवंडी शहराच्या सीमेवरुन वाहणाऱ्या कामवारी नदीचे पात्र शनिवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात वाढले होते. ज्यामुळे नदीकाठच्या विसर्जन घाटासह नदी लगतच्या म्हाडा कॉलनी, संगम पाडा, ईदगहा या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरले होते. अशा परिस्थितीमध्ये सायंकाळी म्हाडा कॉलनी येथे राहणारा 10 वर्षीय आतिफ इरफान शेख या मुलाचा कचरा फेकण्यासाठी गेला असता पाय घसरुन नदीच्या पात्रात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आज म्हाडा कॉलनी जवळील पात्रता आढळून आला आहे.
या दुर्घटनेबाबत पालिका आपत्कालीन कक्षाकडे नोंद नाही
स्थानिक निजामपूर पोलिसांनी त्याचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेऊन या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतू, या दुर्घटनेबाबत पालिका आपत्कालीन कक्ष अथवा अग्निशामक दलाकडे नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबईसह , पालघर, वसई विरार, ठाणे, भिवंडी या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
भिवंडीतील चाविंद्र गावच्या हद्दीतील नदीपात्रात 17 वर्षीय मुलगा बेपत्ता
भिवंडी शहरातील चाविंद्र गावच्या हद्दीत कामवारी नदीपात्रात मित्रांसोबत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाला आहे. गैबी नगर येथील गुलजार नगर येथे राहणारा मोहम्मद गौस नफीस अन्सारी हा आपल्या तीन चार मित्रांबरोबर खेकडे पकडण्यासाठी आला होता. नदीपात्रा जवळ बसलेला असताना बाकीचे मित्र खेकडे पकडत होते. मोहम्मद गैस हा पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रामध्ये बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे आपल्या पथकासह अग्निशामक दल जवानांसह घटनास्थळी पोहचले असून बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
रायगडमध्ये मच्छिमारांची बोट बुडाली
रायगड जिल्ह्यातील दिघीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिघी येथे मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांची बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. मच्छीमारी करताना समुद्राला आलेल्या भरतीमुळं समुद्राच्या लाटेनं ही बोट उलटली आहे. सर्व मच्छीमार खलाशी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. बुडणाऱ्या खलाशांना जेटी बोट फेरी चालकांनी पाहिले असता त्यांना बचाव करुन सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले आहे.
बाहेर काढण्यात आलेल्या मच्छीमारांची नावे
1 हरिश्चंद्र नारायण भुणेशवर
2 कृष्णा लखमा पाटील
3 प्रकाश पांडुरंग झेंगर
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर