IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं…


Aakash Chopra On IND vs ENG 2nd T20I नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना काल झाला. या सामन्यात इंग्लंडनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवला. भारतानं आयर्लंड विरोधातील मालिका दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानं गमावली. यानंतर इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यामुळं भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारत विजय मिळवेल अशी शक्यता होती. मात्र, इंग्लंडनं भारताला पराभूत केलं. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं भारताच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. आकाश चोप्रानं जे कारण सांगितलं ते श्रेयस अय्यरनं देखील मान्य केलं आहे.  

आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूब चॅनेवर बोलताना दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचं काय चुकलं हे सांगितलं आहे. आकाश चोप्रानं म्हटलं की अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांच्या ओव्हरमध्येच मॅच संपली. त्या दोघांच्या ओव्हरमध्ये 39धावा  इंग्लंडनं केल्या. आकाश चोप्रानं मॅच तिथंच संपली कारण आपल्याकडे 225 धावा नव्हत्या.  

आकाश चोप्रानं 16 व्या आणि 17 व्या ओव्हरसंदर्भात भाष्य केलं. चोप्रानं इंग्लंड आणि भारताच्या 16 व्या आणि 17 व्या ओव्हरची तुलना केली. आकाश चोप्रानं म्हटलं की 16 व्या आणि 17 व्या ओव्हरमध्ये  इंग्लंडनं 9 धावा दिल्या. याचवेळी भारतानं 16 व्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या. तर, 17 व्या ओव्हरमध्ये रवि बिश्नोईनं 27 धावा दिल्या. बिश्नोईनं त्या ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकला.  

श्रेयस अय्यरकडून चूक मान्य 

भारताचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं 17 वी ओव्हर भारताला महागात पडल्याचं मान्य केलं. मात्र, श्रेयस अय्यरनं त्याचा थेटपणे उल्लेख केला नाही. 15 व्या ओव्हरनंतर मॅच हातातून निसटल्याचं सांगितलं. श्रेयस अय्यर म्हणाला की मला सर्वकाही कुठं बिघडलं, मात्र, मला खेळाडूचं नाव घ्यायचं नाही. 15 व्या ओव्हरनंतर मॅच आमच्या हातातून निसटली होती. एका नो बॉलनंतर रवी बिश्नोई पुनरागमन करेल, असं वाटलं होतं. मात्र, 17 व्या ओव्हरमध्येच मॅच पलटली, यातून शिकायला हवं, असं श्रेयस अय्यर म्हणाला.  

श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतानं चार टी 20 सामने खेळले होते. या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे आयर्लंडनं देखील भारताचा दोन सामन्यात पराभव केला. भारत इंग्लंड विरोधात तिसरा सामना 7 जुलै रोजी खेळणार आहे. ही मॅच नॉटिंघममध्ये ट्रेंट ब्रिजमध्ये खेळला जाणार आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *