TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…


Tanvi Thakkar and Aditya Kapadia Divorce: ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) फेम  तन्वी ठक्कर (Tanvi Thakkar) हिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. तन्वी आणि तिचा पती आदित्य कपाडिया यांनी लग्नाच्या 5 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच तन्वीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन नात्यातून वेगळे होणार असल्याची बातमी शेअर केली. तिनं आपल्या लांबलचक पोस्टमध्ये आयुष्यातील सर्वात भावनिक निर्णयांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तिनं आणि आदित्यने  एकमेकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आदर म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्ही अभिनेत्रीनं लग्नाच्या 5 वर्षांनंतर नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला (Tv Actress Tanvi Thakkar and Aditya Kapadia Divorce) 

तन्वीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकांनी माझ्या वैयक्तिक आयु्ष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, तसेच बरेच प्रश्नही उपस्थित केले आहेत. बराच विचार करुन मी आणि आदित्यने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा आम्हा दोघांसाठी एक भावनिक निर्णय आहे.  हा निर्णय आम्ही, एकमेकांची आणि आमच्या कुटुंबाची अत्यंत काळजी, आदर आणि विचार करुन घेतला आहे’, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

‘आम्ही हा निर्णय परस्पर समंतीने घेतला असून, यात कोणतेही नकारात्मकता किंवा ड्रामा नाही. यात केवळ शांतता  आणि चांगल्या भविष्याची आशा आहे. यावेळी मी मीडिया आणि इंडस्ट्रीतील लोकांना विनंती करते की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.  आम्हाला आवश्यक असलेला एकांत द्यावा.  मी यावर कुणालाही उत्तर देणार नाही.  तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद’, असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  या कपलची पहिली भेट  ‘एक दुसरे से करते हैं हम प्यार’  या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती.  काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने 2013मध्ये साखरपुडा करण्याचा  निर्णय घेतला. साखरपुड्यानंतर  7 वर्षांनी 2019 साली त्यांनी लग्न केले.  तर, लग्नाच्या 5 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल

आमिर – गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *