Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 22 to 28 June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जून (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरत आहे, आजपासून जूनचा शेवटचा आठवडा 22 ते 28 जून असा नवा आठवडा सुरु होत आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.  

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढलेला दिसेल. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहितांना नवीन ओळखी होऊ शकतात. करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना नवीन करार किंवा ग्राहक मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत, परंतु अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य चांगले राहील, 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमजीवनात स्थैर्य आणि विश्वास वाढेल. विवाहितांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात संयम ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक लाभाचे योग असले तरी गुंतवणूक विचारपूर्वक करा. आरोग्याच्या दृष्टीने आहार आणि झोपेची काळजी घ्या.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जूनचा शेवटचा आठवडा अनेक कामे सहज पूर्ण होतील. प्रेमसंबंधात सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती घ्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संयम बाळगणे आवश्यक आहे. प्रेमजीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळू लागेल. व्यवसायिकांनी भागीदारीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी हा आठवडा यश आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. प्रेमजीवनात आनंददायी क्षण अनुभवता येतील. अविवाहितांना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. करिअरमध्ये नेतृत्वगुणांमुळे प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ आणि रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधात संयम आणि समजूतदारपणा आवश्यक राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नियोजनबद्ध काम केल्यास फायदा होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर भर द्या. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेची काळजी घ्या..

हेही वाचा

Baba Vanga: कठीण काळ संपला, 2026 च्या शेवटी तूळ, मकरसह 4 राशींचे कोट्यधीश होण्याचे योग! बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवाणी कमी लोकांना माहीत, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *