Thane BMW Accident: ठाण्यातील बदलापूरजवळ मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावर एक भरधाव बीएमडब्ल्यू कार (Thane BMW Accident) डिव्हायडरला धडकली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर कार चालवणारा तरुण जखमी झाला. धडक इतकी जोरदार होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली. इंजिन अपघातस्थळापासून सुमारे 30 मीटर दूर फेकले गेले होते. मृतांपैकी एकाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची पोलीस चौकशी करत आहेत, ज्यामध्ये अपघाताच्या काही वेळापूर्वी कार ताशी 250 किमी वेगाने धावत असल्याचे चित्रित झाले होते. बेदरकारपणे गाडी चालवणे आणि स्टंटबाजीमुळे हा अपघात झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मृतांची ओळख वांद्रे येथील रहिवासी योगेश नेगी (26) आणि रेबेका जेकब (24) अशी पटली आहे. बीएमडब्ल्यूचा मालक अंगदवर कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई से सटे बदलापुर इलाके ने BMW कार का बड़ा हादसा..
BMW की स्पीड ज्यादा होने से हाईवे की फेन्स में जा घुसी..
2 की मौत, और एक गंभीर रूप से घायल.
बताया जा रहा है कि BMW की रफ्तार 250 किलोमीटर प्रति किलोमीटर की थी.
पीड़ित अपनी बर्थडे पार्टी मना कर मुंबई की तरफ आ रहे थे. pic.twitter.com/ooyYGTvzNW
— Vivek Gupta (@imvivekgupta) June 22, 2026
धक्क्यामुळे कार पलटी होऊन डिव्हायडरमध्ये
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत योगेश नेगीचा वाढदिवस होता. अंगद, रेबेका आणि योगेश यांनी बदलापूर (पश्चिम) येथे वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर ते द्रुतगती मार्गाकडे निघाले. पोलिसांना ₹9,000 चे बिल मिळाले. द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखण्यासाठी अनेक ठिकाणी काँक्रीटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांना संशय आहे की, चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवताना बॅरिकेड्स चुकवण्याचा प्रयत्न केला असावा, ज्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडकली. या धडकेमुळे कार धडकून दुभाजकामध्ये जाऊन थांबली.
मुंबई से सटे बदलापुर इलाके ने BMW कार का बड़ा हादसा..
BMW की स्पीड ज्यादा होने से हाईवे की फेन्स में जा घुसी..
2 की मौत, और एक गंभीर रूप से घायल.
बताया जा रहा है कि BMW की रफ्तार 250 किलोमीटर प्रति किलोमीटर की थी.
पीड़ित अपनी बर्थडे पार्टी मना कर मुंबई की तरफ आ रहे थे. pic.twitter.com/ooyYGTvzNW
— Vivek Gupta (@imvivekgupta) June 22, 2026
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी मोठा आवाज ऐकला
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “मी शनिवारी रात्री उशिरा चालत होतो, तेव्हा पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान एक गाडी दोनदा भरधाव वेगाने गेली. तिसऱ्या वेळी मला मोठा आवाज ऐकू आला. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. एक तरुणी बऱ्याच अंतरावर पडली होती आणि एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?