Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: नागपूरमध्ये काँग्रेसची मतं फुटली, विकास ठाकरे थेट म्हणाले, ‘प्रदेशाध्यांनी ज्याच्यावर जबाबदारी दिली होती त्याला विचारावं’


Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने (Nagpur Vidhan Parishad Election Result 2026) काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे राजीव पोतदार यांनी विक्रमी विजय मिळवला असताना, काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना स्वतःच्या पक्षाची मतेही राखता आली नाहीत. काँग्रेसची तब्बल 40 मते फुटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी पक्षातील गद्दारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच नागपूर ग्रामीणमधील मतफुटीसाठी थेट निरीक्षकांच्या जबाबदारीवर बोट ठेवले आहे.

नागपूरमधील या धक्कादायक मतफुटीवर अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत विकास ठाकरे म्हणाले की, “जे झालं ते चांगलं नाही झालं. मतं फुटायला नको होती. प्रदेशनं जबाबदारी ज्यांना दिली होती त्यांनी बोलावं. काय झालं, कोणी गद्दारी कोणी? हे शोधून काढण्याचा विषय आहे. नागपूरमध्ये उमेदवार निवडणूक लढला. एकीकडे खासदार, आमदार फुटून राहिले आहेत. ज्या नगरसेवकांनी केलं आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी राहणार आहे. ह्या संपूर्ण विषयावर, अमरावती, चंद्रपूर उमेदवारांची माघार घेतली. ज्यांनी उमेदवार ठरवला त्यांना जबाबदार धरणार आहात का? मतं फुटली त्यांना जबाबदार धरणार आहात का? मी प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत बोलणार आहे. गद्दारी करणाऱ्यांनी चाललं जावं. निरीक्षक होते, त्यांच्यासोबत देखील चर्चा आम्ही करणार आहोत. नागपुरात कोणताही अंतर्गत कलह नाही,” असे त्यांनी म्हटले. 

Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: पक्षाच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं

विकास ठाकरे पुढे म्हणाले की, “नागपूर शहरातली तशी मतं नगरसेवकांची 36 होती बाकी नागपूर ग्रामीणमधली होती. नागपूर ग्रामीणमधील मतांची जबाबदारी निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांची होती. नितीन राऊत प्रदेश वारीवर होते, त्यांनी तिकडून या सगळ्या ठिकाणच्या परिषद निवडणुकीची तयारी केली असणार. जर अशाप्रकारे मत फुटत असतील तर पक्ष कारवाई करेल. जिथे खासदार फुटले, जिथे उमेदवार आणि अर्ज मागे घेतले, तिथे नागपूरमध्ये आम्ही तर मात्र उमेदवाराला निवडणूक लढवायला सांगितले. उमेदवाराने ती लढली. मी प्रांत अध्यक्षांशी बोलेल. मी नितीन राऊत यांच्याशी बोलेल आणि मगच या सगळ्या संदर्भात काय नेमका निर्णय पक्ष घेणार हे सांगेन. पण, पक्षाच्या दृष्टिकोनातून हे होणं चुकीचं आहे. निरीक्षक नितीन राऊत सुद्धा आपली भूमिका मांडतील,” असे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Atul Londhe: ‘भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन आमचे मतदार फोडले; नैतिक दृष्टिकोनातून माझाच विजय; पराभवानंतर काँग्रेस उमेदवार अतुल लोंढेंची पहिली प्रतिक्रिया



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *