Girish Mahajan viral photos with Girl: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. गिरीश महाजन यांच्यासोबत असणारी ही तरुणी कोण आणि त्यांचा तिच्याशी काय संबंध, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अखेर मौन सोडले असून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले त्यांचे फोटो हे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)
मला माहिती नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. फोटो मॉर्फिंग करुन ते दाखवले जात आहेत. सेल्फी दाखवले जात आहेत. पण ते मॉर्फिंग केलेले आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी यावर सविस्तर खुलासा करेन, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारी वरून जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 17/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम व एक्स पोस्ट वरून मॉर्फ केलेले फोटो काढून टाकण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी केली आहे.
आणखी वाचा
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं