Nashik Crime : चारित्र्याच्या संशयावरून संपवलं, नाशिक सुटकेस केसमध्ये मोठा ट्विस्ट! कर्नाटकापर्यंत पाठलाग करून 72 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या | नाशिक बातम्या (Nashik News)


Last Updated:

Nashik Crime Suitcase Death Case : नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा उलगडा झाला असून प्रेयसीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून फेकणाऱ्या आरोपीला आडगाव आणि उपनगर पोलिसांनी अवघ्या 72 तासांत कर्नाटकातून अटक केली आहे.

Nashik Crime Suitcase Death Case New Twist
Nashik Crime Suitcase Death Case New Twist

Nashik Crime Suitcase Case (लक्ष्मण घाटोळ, नाशिक प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरल वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी तपोवनातील केवडीबन परिसरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती मृत महिलेची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी 72 तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी कर्नाटकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराने संपवलं

पोलिसांनी सुटकेसमध्ये बॉडी सापडताच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. तपासादरम्यान मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचं स्पष्ट झालं आणि अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी यानेच हा खून केल्याची माहिती समोर आली.

कल्याण–रत्नागिरी–गोवा मार्गे मंगळूरपर्यंत पाठलाग

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. एवढंच नाही तर मृतदेह बॅगेत टाकून केवडीबन परिसरात फेकला होता. अवघ्या 72 तासांत आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत आरोपीचा शोध घेतला. कल्याण–रत्नागिरी–गोवा मार्गे मंगळूरपर्यंत पाठलाग करून आरोपी गोपीनाथ गोसावीला अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला मुंबईमार्गे पळून गेलेला आरोपी कल्याण, रत्नागिरी, गोवा असा प्रवास करत कर्नाटकातील मंगळूर येथे पोहोचल्याची माहिती मिळाली होती.

अवघ्या 72 तासांत आरोपीला अटक

आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अहोरात्र पाठलाग करत मंगळूर येथील नार्थन पोलीस ठाणे परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयातून घडलेला हा खून पोलिसांनी अवघ्या 72 तासांत उघडकीस आणत आरोपीला गजाआड केलं आहे या जलद कारवाईमुळे नाशिक पोलिसांचे कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/

Nashik Crime : चारित्र्याच्या संशयावरून संपवलं, नाशिक सुटकेस केसमध्ये मोठा ट्विस्ट! कर्नाटकापर्यंत पाठलाग करून 72 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *