Madhurani Gokhale First Video After Exit From MI Savitribai Jyotirao Phule Serial:’मी सावित्रीबाई…’ सोडताच मधुराणी प्रभुलकर यांचा पहिला व्हिडीओ; मालिका का सोडली? चाहत्यांचे प्रश्नच थांबेनात…


Madhurani Gokhale First Video After Exit From MI Savitribai Jyotirao Phule Serial: गेलं काही दिवसांपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ‘ ( Me Savitribai Jyotirao Phule) मालिकेची एकच चर्चा सुरू आहे. TRPचं कारण देत ही मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला. ऐतिहासिक मूल्य असणारी मालिका बंद केल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड रोष होता. मात्र, अभिनेते डॉ अमोल कोल्हे(Amol kolhe)यांनी ही मालिका ‘मराठी वारसा ‘ या युट्यूब चॅनलवर सुरू होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा डॉ अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांना सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या भूमिकेत पाहता येईल असं वाटलं होतं. मात्र, दिसल्याच नाहीत. त्यांनी मालिकेतून निरोप घेतला असून त्यांच्या जागी आता एक नवी अभिनेत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर मालिकेचे चाहते ‘ मालिका का सोडली?’ असं विचारताना दिसत आहेत. 

मालिका सोडल्यानंतर मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट चर्चेत

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ‘ मालिका बंद होत असल्याच्या चर्चेदरम्यान, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नव्हती. उलट या सगळ्या प्रकारावर मौन ठेवणंच त्यांनी पसंत केलेलं. आता स्टार प्रवाह वाहिनीवरून ‘मी सावित्रीबाई .. ‘ मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे. हा व्हिडिओ मालिके संदर्भात नसून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूलकर यांनी त्यांच्या मुलीसोबत हा व्हिडिओ पोस्ट केलाय. आज कालचा अल्फा जनरेशन सोबत कशी पोज द्यायची? अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, त्यांचा प्रश्न मात्र कायम आहे – ‘मधुराणी तुम्ही मालिका का सोडली? ‘. अर्थात यावर त्यांनी अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 

 

 

View this post on Instagram

 

चाहत्यांचे प्रश्न थांबेनात..

मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची भूमिका अनेकांना जाणून घ्यायची आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर त्यांचे व मालिकेचे चाहते सिरीयल बंद होण्याची कारण विचारत आहेत. तर काहींनी मालिकेतून एक्झिट का घेतलीत?असा सवालही करत आहेत. यावर आता अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर काही स्पष्टीकरण देतात का? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *