ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये


TMC Bank Account Freeze : बंगाल पोलिसांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) तीन बँक खाती गोठवली आहेत. एचडीएफसी बँकेतील या तीन खात्यांमधून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील पराभवानंतर, तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत संघर्ष आता पक्षाच्या आर्थिक बाबी आणि मालमत्तेच्या मुद्द्यावर केंद्रित झाला आहे.

अरुप बिस्वास यांचे बँकेला पत्र

पक्षाचे माजी खजिनदार अरूप बिस्वास यांनी यापूर्वी एचडीएफसी बँकेला पत्र लिहून पक्षाची खाती गोठवण्याची विनंती केली होती. पक्षाच्या खऱ्या नेतृत्वाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही, असे त्यांनी म्हटले होते. या महिन्याच्या सुरुवातीला अरूप बिस्वास यांना या पदावरून हटवण्यात आले होते. अरूप बिस्वास यांचे हे पत्र अशा वेळी बँकेला सादर करण्यात आले, जेव्हा टीएमसीच्या 20 लोकसभा खासदारांनी सभापती ओम बिरला यांची भेट घेऊन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (NCPI) विलीन होण्याची घोषणा केली. हे बंडखोर खासदार म्हणतात की तेच खरी टीएमसी आहेत आणि ते पक्षाचे नाव व चिन्हावर आपला हक्क सांगतील.

तृणमूल काँग्रेसकडे एकूण किती मालमत्ता ?

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या 2024-25 च्या लेखापरीक्षण अहवालानुसार, तृणमूल काँग्रेसकडे 1081.78 कोटींची एकूण मालमत्ता आहे. यापैकी 625.78 कोटी बँक खात्यांमध्ये,250.77 कोटी गुंतवणुकीत आणि 50 कोटी धनादेशांच्या (चेक्सच्या) स्वरूपात आहेत. अरूप बिस्वास यांनी म्हटले होते की, बँकेने पक्षाच्या खात्यातील ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी आणि कोणत्याही डेबिट व्यवहारांवर किंवा खात्याच्या कार्यप्रणालीच्या नियमांमधील बदलांवर बंदी घालावी. जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत निधीचे संरक्षण करण्यासाठी आणि कोणतेही अनधिकृत पैसे काढणे, हस्तांतरण किंवा इतर व्यवहार रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मालमत्तेच्या नियंत्रणावरून वाद

बिस्वास यांनी दावा केला की, पक्षाच्या कामकाजाच्या आणि मालमत्तेच्या नियंत्रणावरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, पक्षाचा निधी अधिकृत नसलेल्या व्यक्तींकडून वापरला जाण्याची चिंता असणे स्वाभाविक आहे. ते म्हणाले, “पक्षाचा निधी सुरक्षित ठेवला पाहिजे आणि तो केवळ पक्षाच्या कायदेशीर व अधिकृत नेतृत्वाचा भाग असलेल्या, तसेच पक्षाचे नाव, चिन्ह, मालमत्ता आणि कामकाज नियंत्रित करण्याचा कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तींनीच वापरला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या:

Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *