धावत्या ट्रेनच्या खिडकीला आढळला लटकलेला मृतदेह, भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर खळबळजनक घटना


Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्टेशनवरर खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही पायही तुटलेले होते. घटनेची माहिती मिळताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. 

या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ

नागपूरच्या इतवारी इथून टाटानगरकडे जाणाऱ्या एका धावत्या ट्रेनच्या खिडकीला बाहेरच्या बाजूनं एका इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना आढळून आला आहे. भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकावरून टाटानगरकडं जाणाऱ्या ट्रेनच्या एका डब्याला बाहेरच्या बाजूनं एका 40 ते 45 वर्षीय इसमाचा मृतदेह लटकत होता. ट्रेन जेव्हा तुमसर रोड स्टेशनवर पोहोचली, तेव्हा ही खळबळजनक घटना प्रवाशांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे, या इसमाचे पाय प्रवासादरम्यान पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हीची तपासणी सुरु

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. मात्र, या मृत व्यक्तीची ओळख पटवणं आता रेल्वे पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान ठरलं आहे. हा इसम नेमका कुठून ट्रेनमध्ये चढला किंवा लटकला, याचा शोध घेण्यासाठी आता रेल्वे पोलीस इतवारी ते तुमसर रोड दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी करत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात शेळी शोधण्याकरिता जंगलात गेलेल्या एका मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात शेळी शोधण्याकरिता जंगलात गेलेल्या एका मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय आहे. नागभीड तालुक्यातील गिरगांव जंगलातली ही घटना असून आत्माराम दसरू बोरकर (52) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. शेळया चराई करीता काल तो गिरगांव जगलात गेला होता. सर्व शेळया चराई करुन घराकडे परतल्या. मात्र कळपात एक शेळी कमी आढळल्याने शेळी शोधण्याकरिता गुराखी जंगलात गेला. तो परत न आल्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी जंगल परिसरात रात्रभर शोधाशोध केली. मात्र पत्ता लागला नाही. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभाग व पोलिसांनी आज सकाळी शोधमोहीम राबविली. अखेर आज सकाळी त्याचे शव आढळून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *