Operation Tiger UBT Shivsena: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचा राजकीय अवकाश व्यापून टाकलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला एक्स्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हे फोटो एका पंचतारांकित हॉटेलमधील असून यामध्ये ठाकरे गटाचे काही फुटीर खासदार दिसत आहेत. या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) दिसून येत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत हे फुटीर खासदार दिसून येत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्या रणनीतीतून ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची रणनीती आखली जात होती. त्यासाठी गुप्त भेटीही सुरु होत्या. अखेर साधारण सोमवारी ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याचे स्पष्ट झाले होते. (Maharashtra Politics News)
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे