Om Raje Nimbalkar Operation Tiger : ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी


Om Raje Nimbalkar Operation Tiger successful : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी ठरले असून, ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या स्वतंत्र गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जाणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील दिल्लीत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या बातमीमुळे धाराशिवमधील ठाकरे गटाचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी ओमराजे यांना थेट इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी एकत्र येत स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र कालच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले होते. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला तात्काळ मान्यता दिली आहे. आगामी 19 जून रोजी शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे आणि शिंदे गट) आपला पक्ष वर्धापन दिन साजरा करणार आहेत. या वर्धापन दिनाच्या अवघ्या दोन दिवस आधीच ही उभी फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

दिसतील तिथं तोंडाला शेण फासू; धाराशिवमध्ये शिवसैनिकांचा संताप (Om Raje Nimbalkar Operation Tiger successful)

या संपूर्ण बंडखोरीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. ओमराजे सध्या दिल्लीत असून, ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होणार आहे.  ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या वृत्तामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाले आहेत. धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गद्दारी सहन केली जाणार नाही, असा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

“उद्धव साहेबांनी ओमराजे यांना भरभरून दिले. त्यांना एकदा आमदार आणि दोनदा खासदार केले. एवढे सगळे मिळूनही जर ते आईसारख्या शिवसेनेला सोडून जात असतील, तर हे अत्यंत वेदनादायी आहे. ओमराजे निंबाळकर जर शिंदे गटात गेले, तर ते धाराशिवमध्ये जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला शेण आणि काळं फासू!” असे शिवसैनिक म्हणाले.

उद्धव सेनेसमोर मोठे आव्हान

6 खासदारांच्या या बंडखोरीमुळे संसद भवनातील ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वर्धापन दिनाच्या तोंडावर झालेल्या या राजकीय भूकंपामुळे ठाकरे गटाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हे ही वाचा –

Operation Tiger UBT Shivsena: अमित शाहांनी मोदींना फोन फिरवला, ग्रीन सिग्नल मिळताच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरु केलं, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *