Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, “आणखी दोघे माझ्या संपर्कात”


Amravati:  उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बंडखोर खासदार नवी दिल्लीत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. त्यानंतर या सहा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळीच लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांचं कार्यालय गाठलं.  ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आणि शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटताच आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं. ‘जैसी करणी वैसी भरणी’ असं म्हणावं तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’वर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रवी राणा ?

एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’वर आमदार रवी राणा म्हणाले ‘ जैसी करणी वैसी भरणी ‘ ठाकरेंच्या फुटलेल्या सहा आमदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टी यावं अशी खुली ऑफर दिली. ठाकरे गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार आहेत. ठाकरे गट पूर्ण खाली होणार आहे. ठाकरेंचे आणखी दोन खासदार माझ्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितलं, असंही ते म्हणाले. ते मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनित राणा आणि मला 14 दिवस दिवस उद्धव ठाकरे यांनी जेलमध्ये टाकलं. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं. 

दरम्यान, पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार, दोन तृतीयांश खासदार कुठल्या मुळे या गटातील खासदारांवर कोणतेही कारवाई होऊ शकत नाही . त्यामुळे लवकरच सहा खासदारांचा हा गट शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.

काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. 

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *