CNG PNG Price Hike Pune: पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?


CNG PNG Price Hike Pune News : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी (Petrol Diesel Prices Hike) हैराण झालेल्या पुणेकरांना आता पुन्हा एकदा महागाईचा आणखी एक मोठा झटका सहन करावा लागणार आहे. कारण पुण्यात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयांची, तर पीएनजीच्या (PNG) दरात 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. (PNG CNG Prices Hike)

दरम्यान, MNGL कडून मध्यरात्री पासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून सोमवारी म्हणजेच काल रात्रीपासून हि दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरवाढीनंतर सीएनजीची किंमत 95.75 प्रति किलो झाली असून महागाईचा फटका आता सीएनजी धारकांनाही बसणार आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Petrol Diesel Prices Hike : डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार? 

केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या निर्यातीवरील शुल्कात वाढ केली आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹14 आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹12.50 शुल्क आकारले जाईल. मात्र, पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Petrol Diesel Prices Hike : पेट्रोल आणि डिझेल अधिक महागणार?

सध्या तरी जनतेने घाबरण्याची गरज नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ असा की, या निर्णयाचा पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किमतींवर थेट परिणाम होणार नाही.

Petrol Diesel Prices Hike : शुल्क वाढवण्याचा उद्देश काय?

डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे तेल कंपन्यांसाठी इंधनाची निर्यात अधिक महाग होईल आणि देशांतर्गत बाजारात पुरेशी उपलब्धता राखण्यास मदत होऊ शकते.

Petrol Diesel Prices: किमती कधी वाढू शकतात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती केवळ शुल्कावर अवलंबून नसतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, भू-राजकीय तणाव आणि सरकारची कर धोरणे यांचीही यात मोठी भूमिका असते. जर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर भविष्यात इंधनाच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. तथापि, सध्याच्या निर्णयामुळे तात्काळ दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *