Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?


Hardik Pandya LSG IPL 2026 : आयपीएल 2026 च्या साखळी सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मानसिक थकवा आणि दुखापतीमुळे संघ सोडणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने अचानक लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे लखनऊचा संघ एका अनुभवी भारतीय नेतृत्वाच्या शोधात आहे. या दोन्ही घडामोडी एकाच वेळी घडल्यामुळे हार्दिक पांड्या लखनऊचा नवा कर्णधार बनणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

प्री-ऑक्शन ट्रेडिंग अन् आर्थिक गणिते (Complex Logistical Realities of the Pre-Auction Window IPL)

कागदावर हार्दिक आणि लखनऊचे समीकरण जितके सोपे वाटते, तितके ते प्रत्यक्षात नाही. आयपीएल आता ‘मिनी-ऑक्शन’ टप्प्यात प्रवेश करत असल्यामुळे लखनऊला हार्दिकला थेट लिलावातून खरेदी करता येणार नाही. यासाठी दोन्ही फ्रँचायझींना लिलावापूर्वी ‘ट्रेडिंग विंडो’ अंतर्गत कायदेशीर करार करावा लागेल. मुंबई इंडियन्स हार्दिकसारख्या स्टार खेळाडूला सोडण्यासाठी लखनूकडून मोठ्या रकमेची किंवा देशांतर्गत दर्जेदार खेळाडूंची मागणी करू शकते.

हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा (Hardik Pandya CSK Trade)

हार्दिकला संघात घेण्यासाठी केवळ लखनऊच नाही, तर इतर संघही उत्सुक आहेत. चेन्नई सुपर किंग्स (CSK) हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी बोली लावू शकते. भारताचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक खळबळजनक ‘ट्रेड डील’ सुचवली आहे. बद्रीनाथ यांच्या मते, “जर मी मुंबई इंडियन्सच्या जागी असतो, तर हार्दिक पांड्याच्या बदल्यात चेन्नईकडून शिवम दुबे आणि आयुष म्हात्रे यांना संघात घेतले असते. संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या ही त्रिमूर्ती चेन्नई ब्रँडला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल.” त्यामुळे चेन्नईच्या अशा तगड्या ऑफरला टक्कर देण्यासाठी लखनऊकडे मजबूत खेळाडू किंवा मोठी रक्कम असणे गरजेचे आहे.

दुखापतीचे सावट अन् लखनऊसमोरील पेच

32 वर्षीय हार्दिक पंड्याची शारीरिक तंदुरुस्ती हा लखनऊच्या व्यवस्थापनासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. पीटीआय (PTI) ने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक सध्या पाठीच्या गंभीर दुखापतीने त्रस्त आहे. एका सूत्राने सांगितले की, “हार्दिक मानसिकदृष्ट्या थकलेला होता आणि त्याला पाठीची दुखापतही झाली होती. प्ले-ऑफमधील मुंबईचे आव्हान संपुष्टात येताच त्याने संघ व्यवस्थापनाला आपण पुढील हंगामात थांबणार नसल्याचे स्पष्ट केले.”

लखनऊचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांच्या मार्गदर्शनाखालील व्यवस्थापनाला आता विचार करावा लागेल की, दुखापतग्रस्त खेळाडूभोवती संघाची पुनर्बांधणी करणे योग्य ठरेल का? जर लखनऊने अंतर्गत बदलांना प्राधान्य दिले, तर विद्यमान उपकर्णधार निकोलस पूरन हा कर्णधारपदासाठी नैसर्गिक पर्याय ठरेल.

हे ही वाचा –

IPL 2026 News : ऋषभ पंतची पहिली विकेट, हार्दिक पांड्याही कंटाळला; अजून ‘या’ 3 कर्णधारांची खुर्ची धोक्यात, लिस्ट वाचून सगळेच हैराण

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *