SIR in Maharashtra : 2002 ला VOTER ID च बनला नाही, मग SIR चा फॉर्म कसा भरायचा? सोप्पी ट्रिक समजून घ्या | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

फॉर्म भरताना 2002च्या एसआयआर यादीचा तपशील तुम्हाला द्यावा लागणार आहेत.त्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत.काहींच म्हणण आहे, आमचा त्यावेळी वोटींग कार्डच बनलं नाही, मग तपशील कसा द्यायचा? अशा तरुण तरुणींनी एसआयआर फॉर्म कसा भरायचा? हे जाणून घेऊयात.

SIR in Maharashtra
SIR in Maharashtra

How to fill SIR Form online : महाराष्ट्रासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण (SIR) सूरू झाले आहे.या एसआयआरमध्ये बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुम्हाला एक फॉर्म देणार आहेत, जो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून भरून सबमिट करायचा आहे.पण हा फॉर्म भरताना 2002च्या एसआयआर यादीचा तपशील तुम्हाला द्यावा लागणार आहेत.त्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत.काहींच म्हणण आहे, आमचा त्यावेळी वोटींग कार्डच बनलं नाही, मग तपशील कसा द्यायचा? अशा तरुण तरुणींनी एसआयआर फॉर्म कसा भरायचा? हे जाणून घेऊयात.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मागे सांगितल्या प्रमाणे तुमच्या प्लेस्टोरवर जायचंय आहे आणि त्यात ECINET हा ॲप Install करायचा आहे. या ॲपवरून तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता.पण ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि वोटर आयडीवर नाव सेम असणे गरजेचे आहे. त्यात नावाच जर छोटीशी चुक जरी असेल तर ते शक्य होणार नाही आहे.त्यामुळे अशा मतदारांना ऑफलाईन फॉर्म भरण्याचा पर्याय निवडणे फायद्याचे ठरेल.

आता ॲप Install झाल्यानंतर तु्म्हाला पहिल्यांदा तुमचा 2002 च्या एसआयआर यादीतला तपशील शोधायचा आहे. आता जर 2002 च्या आधी तुमचा जन्म झाला होता, पण वोटींग कार्ड बनवण्याच तुमचं वयच झालं नव्हतं.तर तुमचं नाव 2002 च्या एसआयआर यादीत असणारच नाही आहे.कारण त्यावेळी तुमच्याकडे वोटींग कार्ड नव्हतं.पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तुमचं नाव नाही तर तुमच्या आई वडिलांच नाव 2002 च्या एसआयआर यादीत शोधायचं आहे. हा तपशील तुम्हाला कामाला येणार आहे.

हा तपशील कसा शोधायचा?हे समजूयात. ECINET ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला पहिल्यांदा 2002च्या लिस्टमध्ये तुमची आई किंवा वडील यांचे नाव शोधायचे आहे.आई वडिल नसले तर नातेवाईकांची नाव शोधा. हे नाव शोधताना तुम्हाला आई वडिलांच्या संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला आई वडिलांची माहिती मिळणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्याचा स्किनशॉट घ्या, कारण फॉर्म भरताना तुम्हाला हा स्किनशॉट लागणार आहे.

असा फॉर्म भरता येणार?

त्यानंतर तुम्हाला ॲप मध्ये असलेल्या Voter Registration Form वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला SIR form fill Online या पर्यायावर क्लिक करायचं आहे.क्लिक केल्यावर तु्म्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा पर्याय येईल. जर तुमच या अॅपवर अकाऊंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी भरून लॉगिन करू शकता.

पण जर तुमचं अकाऊंट नसेल तर तु्म्हाला न्यू युझरवर क्लिक करावं लागणार आहे.त्यानंतर तु्म्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी भरावा लागेल, अशाप्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर Voter Registration Form वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला SIR form fill Online या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Enumeration Form कसा भरणार?

इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायच आहे आणि नंतर EPIC नंबर टाकून सबमिट करायचं आहे.सबमिट केल्यानंतर तुमची माहिती दाखवली जाईल.आता जर तुमचा मोबाईल नंबर वोटर आयडीशी लिंक नसेल तर खाली क्लिक हिअर हा पर्याय आहे. या पर्यायावर क्लिक करून मोबाईल लिंक करून घ्या. त्याच्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही. मोबाईल लिंक झाल्यावर तुम्हाला पुन्हा Enumeration Form वर येऊन मोबईल नंबर टाका ओटीपी आल्यानंतर तो भरा.

ओटीपी टाकल्यानंतर 4 पर्याय येतील…

जर तुमचं स्वत:च नाव 2002 च्या एसआयआर यादीत नाव असेल तर तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे.जर नसेल तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय आहे. जर तुमच्या आई वडिलांचे नाव एसआयआर यादीत असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याचं नाव शोधून पार्ट म्हणजेच सिरियल नंबर टाकून फॉर्म सबमिट करू शकता.

जर तुमचं नाव 2002 च्या एसआयआर यादीत नाही आहे.आणि तुमच्या आई वडिल नातलंगांचे देखील नाव नाही आहे. पण जर 2025-26च्या यादीत तर आई वडिलांचे नाव असेल तर तिसरा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर त्याचं नाव शोधून पार्ट म्हणजेच सिरियल नंबर टाकून फॉर्म सबमिट करू शकता. वरील प्रोसेस प्रमाणेच.

शेवटचा आणि चौथा पर्याय म्हणजे ज्या मतदार वरच्या तीनही पर्यायात बसत नाहीत.त्याच कोणत्याच एसआयआर यादीत नाव नाही आहे.त्यांनी चौथा पर्याय निवडायचा आहे. आणि आपलं संपूर्ण माहिती भरून सबमिट करू शकता.

वरीच 4 पर्यायांपैकी तुम्ही बसत असलेला पर्याय निवडून फॉर्म भरा आणि सबमिट करा.अशाप्रकारे तुमचा फॉर्म भरला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *