Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) अनेक बदल केले जातायत. टेस्ट क्रिकेट (Test Cricket) आणि टी20 क्रिकेटमधून (T20 Cricket) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohali) निवृत्ती घेतली. त्यानंतर अनेक नव्या खेळाडूंना संघात संधी मिळाली. दरम्यान, आता रोहित शर्माच्या 2027 सालच्या आगामी वन डे (IND vs ENG ODI) विश्वचषकात खेळण्याच्या आशेवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं 2027 सालच्या वन डे विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा रोहित शर्मा हा भाग नसल्याचं त्याला कळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली लॉर्डसची तिसरी वन डे रोहितच्या कारकीर्दीतली अखेरची वन डे ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, तुम्हाला माहितीय का? फक्त रोहितच नाही तर टीम इंडियामधील अनेक अनुभवी खेळाडू देखील आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्यावर आहेत आणि येणाऱ्या काळात कधी ही निवृत्तीची घोषणा करू शकतात.

रोहित शर्मा (Rohit Sharma)
कसोटी क्रिकेट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलविदा म्हटलेल्या रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं भवितव्य चर्चेचा विषय बनलंय. मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंड दौऱ्यातली लॉर्डसची तिसरी वन डे रोहितच्या कारकीर्दीतली अखेरची वन डे ठरू शकते, असं सांगितलं जातंय. त्यामुळे सहाजिकच येत्या 2027 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही, असं बोललं जातंय.

विराट कोहली (Virat Kohli)
विराट कोहलीनं रोहित शर्मा प्रमाणेच कसोटी क्रिकेट आणि टी20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. त्यातच वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूपच दमदार आहे, पण आता सिलेक्टर्सना टीम इंडियामध्ये नव्या खेळाडूंना संधी द्यायची असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे विराट कोहलीसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, असं बोललं जातंय.

मोहम्मद शामी (Mohammed Shami)
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी सध्या दुखापतींशी झुंजतोय. आता मोहम्मद शामी टीम इंडियामध्ये परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशातच टीम इंडियात नवख्या गोलंदाजांनी आपली दावेदारी मजबुत केलीय. अशा परिस्थितीत येत्या काळात मोहम्मद शामीसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
टीम इंडियाच्या गोलंदाजीचा सर्वात मोठा पाया असलेला, भुवनेश्वर कुमारसुद्धा बऱ्याच काळापासून मैदानापासून दूर आहे. टीम इंडियाच्या सिलेक्टर्सचा कल आता नव्या युवा खेळाडूंकडे असल्यामुळे आता भुवनेश्वर कुमारला संधी मिळण्याची शक्यता तशी धूसरचं मानली जातेय. त्यामुळे आता भुवनेश्वर कुमारसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, अशा चर्चा आहेत.

रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)
टी20 वर्ल्डकप 2024 नंतर रवींद्र जाडेजानं क्रिकेटमधल्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीय. अशातच आता वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्येही युवा ऑलराउंडर्सना मोठी संधी देत आहे. याच कारणामुळे आता येणाऱ्या काळात रवींद्र जाडेजा सुद्धा निवृत्ती घेऊ शकतो, असं म्हटलं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :