Ranveer Singh Cameo In Shah Rukh Khan King: इकडे रणवीर सिंहवर FWICEची बंदी, तिकडे शाहरुख खानच्या 350 कोटींच्या बिग बजेट चित्रपटात संधी?


Ranveer Singh Cameo In Shah Rukh Khan King: ‘धुरंधर 2’च्या (Dhurandhar 2) अभूतपूर्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) याची लोकप्रियता आणि स्टारडम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दिग्दर्शक आदित्य धर (Director Aditya Dhar) यांच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) फ्रँचायझीनं रणवीर सिंहला (Ranveer Singh) खऱ्या अर्थानं बॉलिवूडचा (Bollywood News) नवा सुपरस्टार बनवलंय, अशी चर्चा रंगली आहे. आता रणवीर सिंहच्या हाती बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Bollywood Superstar Shah Rukh Khan) यांचा एक मोठा चित्रपट लागल्याची माहिती समोर येत आहे. या सिनेमाचं बजेट तब्बल 350 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. आता यामुळे शाहरुख खानसोबतच्या 350 कोटींच्या सिनेमासाठी रणवीर सिंहनं ‘डॉन 3’ सोडला, अशा चर्चा रंगल्या आहेत. 

भुवया उंचावणारी बाब म्हणजे, जेव्हा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) नं रणवीर सिंह याच्याविरोधात बंदी घालण्याची घोषणा केल्याची चर्चा सुरू आहे. रणवीरनं ‘डॉन 3’ सोडल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलंय आणि त्यातच, आता रणवीर ‘किंग’ सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. नेमके हे प्रकरण काय आहे, सविस्तर  जाणून घेऊयात…

रणवीर सिंहच्या हाती लागली मोठी फिल्म

निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर याच्या बहुचर्चित ‘डॉन 3’ सिनेमाशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) नं कारवाई करत सर्व निर्मात्यांना रणवीर सिंह याला आपल्या सिनेमांमध्ये कास्ट करू नये, असं आवाहन केलं आहे. या निर्णयामुळे रणवीर सिंह यांच्यावर एकप्रकारे बंदी घालण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, ‘धुरंधर’ स्टार रणवीर सिंह यांची ‘किंग’ एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या शाहरुख खान यांच्या ‘किंग’ सिनेमाचं बजेट विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार, 350 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय.

रिपोर्टनुसार, रणवीर सिंह या बिग-बजेट सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांची भूमिका कॅमिओ स्वरूपाची असेल. मात्र, सिनेमाच्या कथानकासाठी त्याचं पात्र अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘किंग’ सिनेमात रणवीर सिंह याच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण ही चर्चा खरी ठरल्यास रणवीर सिंह आणि शाहरुख खान हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकताना पाहायला मिळतील.

‘किंग’ सिनेमाची स्टारकास्ट

सुपरस्टार शाहरुख खानची’किंग’ एक मल्टी स्टारर फिल्म आहे, ज्यामध्ये सुहाना खान, अभिषेक बच्चन, राघव जुयाल, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, दीपिका पादुकोण आणि आता रणवीर सिंहसारखे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, ‘किंग’ यावर्षी ख्रिसमसच्या निमित्तानं रिलीज केला जाणार आहे. 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *