Vidhan Parishad Election 2026 : प्रसारमाध्यमातून मला पण माहिती मिळाली की काँग्रेसचे (Congress) 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहे. मात्र मी काही काँग्रेस नेता नाही, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना सांभाळण्याची जवाबदारी ही माझी नाही. मी त्या भागातील आमदार असल्याने माझ्या मतदारसंघातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायत मधील नगरसेवक माझ्या संपर्कात असतात, त्यांचे काम करून घेण्यासाठी ते आमदार म्हणून माझ्या संपर्कात असतात. पण निवडणुकीच्या अनुषंगाने मी कोणाशीही संपर्कात नाही. मात्र भाजपचा कार्यकर्ता असल्याने निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत होईल, असा माझा प्रयत्न असतो. असं सूचक विधान चिमूर विधानसभेचे आमदार आणि भाजप नेते बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) यांनी केला आहे.
Bunty Bhangdiya: विक्ट्री साईन दाखवत फोटो, काँग्रेसचे नगरसेवक भाजप सोबत उघडपणे सोबत?
चंद्रपूरचे काँग्रेसचे सहलीला गेलेले नगरसेवक उघडपणे भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्यासोबत दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंटी भांगडीया यांच्या नागपूर येथील कार्यालयात काल (25 मे) रात्री सिंदेवाही येथील काँग्रेसचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावार मयूर सूचक, दिलीप रामटेके आणि अमृत मडावी यांनी विक्ट्री साईन दाखवत फोटो देखील काढले. सोबतच कोरपणा येथील काँग्रेसचे 13 नगरसेवक देखील भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातला एक फोटो देखील समोर आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नगरसेवक भाजप सोबत उघडपणे सोबत आल्याचं दिसून येत आहे. यावर आता बंटी भांगडिया यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला आहे.
Bunty Bhangdiya: कोणी काश्मीर घाटीत गेलं असेल, फोन नॉटरीचेबल असेल तर त्याला मी जवाबदार कसा?
पुढे बोलताना ते म्हणाले कि, वडेट्टीवारही बोलले त्यांच्या संपर्कात 100 भाजप नगरसेवक आहे. वडेट्टीवार यांच्याकडे घोडेबाजारचा पुरावा असेल, तर आरोप करणाऱ्यांनी द्यावा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहे. कोणी परिवरसाहित सुट्टीसाठी गेले आहे का हे त्यांनी तपासावे. कोणी काश्मीर घाटीत गेलं असेल, फोन नॉटरीचेबल असेल तर त्याला मी जवाबदार कसा? निवडणुकीत अदृश्य शक्ती असतात ते काम करत असतात. कोणी मतदार आम्हाला मदत करतो म्हणून येईल तर आम्ही मदत घेऊ, त्यांचे स्वागत करू. असेही बंटी भांगडिया म्हणाले.
Bunty Bhangdiya: विक्ट्री साइन दाखविला तर त्यात गैर काय?
हे गुप्त मतदान आहे. जे फोटो वायरल होत आहे, ते माझ्या कार्यालयातील आहे. पण ते आताचे नाही. तो नगरसेवक मला कामाच्या निमित्याने मला वारंवार भेटतो. त्याच्या सोबत एक नाही, अनेक फोटो आहे. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेले ते फोटो नाही. मित्र आहे, विक्ट्री साइन दाखविला तर त्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केलाय.
BJP : उमेदवार आमची चॉईस नाही, भाजप आमची चॉईस
मी तीन दिवस नव्हतो, त्यामुळे भेटीचा प्रश्न नाही. आपल्या पक्षातील नागरसेवकांवर काय कारवाई करावी, हा वडेट्टीवार यांचा प्रश्न आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून मला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करणार. उमेदवार आमची चॉईस नाही, भाजप आमची चॉईस आहे. असेही बंटी भांगडिया म्हणाले. जो पक्ष उमेदवार देईल तो आम्हाला मान्य असेल. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा