Ebola Virus: जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना


Ebola Virus In India : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये वाढत्या इबोला (Ebola Virus)रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगावरील तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती यावेळी जे. पी. नड्डा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. परिणामी केंद्रीय आरोग्य पथक त्या दृष्टीने सतर्क झाले असून विशेष खबरदारी घेताना दिसत आहे.  (Ebola Virus In India)

संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP (Ebola Virus In India)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचे सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांना रुग्णांचा मागोवा, तपासणी आणि देखरेख यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि इतर प्रवेशबिंदूंवर वाढीव तपासणी आणि देखरेख उपाय सुरू करण्यात आले असून, तपासणी, क्वारंटाईन, वैद्यकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा चाचण्या आणि संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार इबोलाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने समन्वय साधत आहे.

J. P. Nadda : आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या इबोला उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगासंदर्भातील तयारी आणि देखरेख उपाययोजनांचा आज आढावा घेतला. सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, “आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.” मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) आणि आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHECS) घोषित केल्यानंतर, भारत सरकार आफ्रिकेतील इबोलाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात देखरेख आणि तयारीच्या उपाययोजना सक्रियपणे अधिक कडक केल्या आहेत.

दरम्यान, 24 मे 2026 रोजी भारताने नागरिकांना काँगो लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळण्याचा प्रवास सल्ला जारी केला होता. त्यापूर्वी, 21 मे 2026 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इबोला रोगासंदर्भातील सार्वजनिक आरोग्य तयारी आणि प्रतिसादासाठी SOP जारी केली होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळावयाच्या नियमांचा समावेश होता. तसेच 22 मे 2026 रोजी रुग्णालयांतील संसर्ग नियंत्रण, विलगीकरण सुविधा तयारी आणि इबोला रुग्णांच्या मृतदेहांचे सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.

Ebola Virus In India : इबोला उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप

एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) विभाग आणि विमानतळ आरोग्य संस्थांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये अस्पष्ट तापजन्य आजारांबाबत अधिक सतर्कता ठेवण्याचे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ अहवाल देऊन व्यवस्थापन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इबोला हा उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे. सध्या बुंडीबुग्यो विषाणू प्रकारामुळे होणाऱ्या इबोला रोगासाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.

इतर महत्वाच्या बातम्या  

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *