Last Updated:
या भागात टँकरच्या दुरुस्तीचे काम केले जाते.दुपारच्या सुमारास एका टँकरच्या टाकीचं काम सुरू होतं. काम सुरू असताना केमिकल टँकरचा स्फोट झाला.
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर परिसरामध्ये केमिकल टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेमुळे परिसरातील इमारतीच्या गाड्यांच्या काचा फुटल्या. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील जिजामातानगर येथील मैसूर कॉलनीमध्ये ही घटना घडली. या भागात टँकरच्या दुरुस्तीचे काम केले जाते. दुपारच्या सुमारास एका टँकरच्या टाकीचं काम सुरू होतं. काम सुरू असताना केमिकल टँकरचा स्फोट झाला. या टँकरचे वेल्डिंग करण्यासाठी हा टँकर आला होता. याचे वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक या टँकरमध्ये हा स्फोट झाला.
मुंबई: चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी,
आसपासचा इमारतीच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या pic.twitter.com/mnaadySoK8
— News18 Marathi (@News18_marathi) July 17, 2026
हा स्फोट इतका भीषण होता की, टँकरचे दोन तुकडे झाले. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या. या स्फोटामध्ये ड्रायव्हर आणि वेल्डर जखमी झाले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. स्फोट झाल्यानं आसपासचा इमारतीच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. घटनास्थळी आरसीएफ पोलीस दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
Mumbai: मुंबईमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, परिसरात घरं आणि गाड्यांच्या फुटल्या काचा, घटनास्थळाचा पहिला VIDEO
