Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी… सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’चा टीझर रिलीज


Kala Hiran The Battle for Legacy Teaser: वादाच्या कचाट्यात सापडल्यानंतरही ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’ (Kala Hiran The Battle for Legacy) चा टीझर (Cinema Teaser) आज रिलीज झाला आहे.  या बहुचर्चित टीझरमध्ये  सुरुवात ते शेवटपर्यंत कोर्टरुम ड्रामा दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज होताच, लाखोच्या घरात लाइक्स आणि शेअर मिळत आहे. 1 मिनिट 56 सेकंदाच्या टीझरमध्ये, शिकार प्रकरण, साक्षीदारांचे जबाब, पोलीस तपास आणि न्यायालयातील युक्तीवाद दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 

‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’ चा टीझर रिलीज (Kala Hiran The Battle for Legacy teaser released today)

‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’ या सिनेमात मुख्य भूमिका काशिफ  इकबाल खान याने साकारली आहे.  त्याने या सिनेमात अयान खानची भूमिका साकारली आहे.  दरम्यान, या सिनेमातील हे पात्र सलमान खानशी प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे. हा बहुचर्चित सिनेमा सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणावर  आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे.   परंतु, मेकर्सने या सिनेमावर करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन केले आहे. 

टीझरची सुरुवात अभिनेता गोविंद नामदेव यांच्या आवाजाने होते.   या सिनेमात गोविंद नामदेव  हे बिश्नोई समाजातील एका वकिलाची भूमिका साकारत आहेत.  टीझर जसजसा पुढे जातो. तसतसं कथेतील गुढ अधिक वाढत जाते.   या टीझरमधून अभिनेत्याचीही झलक पाहायला मिळत आहे.  टीझरच्या शेवटी  काशिफ  इकबाल खान याचा एक डायलॉग ऐकू येतो.   ज्यात तो म्हणतो, ‘जितक्या रुपयांत माझी एक फिल्म तयार होते. तेवढ्या पैशात मी एक  एक हजार ड्रायव्हर विकत घेईन,   आणि  कोर्टात त्यांचे जबाब बदलू शकतो’, असं अभिनेता म्हणतो.

मुख्य म्हणजे, सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये अयान खानचा लूक अगदी सलमान खानसारखा वाटतो. इंटरनेटवर अयान खानचा लूक सलमान खानशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली आहे.  यात त्याच्या हातात ब्रेसलेट असल्याचंही दिसून येत आहे.   दरम्यान, वाद टाळण्यासाठी  सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील पात्रांची नावे बदलली आहेत.   या सिनेमातील मुख्य पात्राचे नाव अयान खान असून,  लॉयन बिश्नोई याच्या विरोधात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा अद्याप रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *