Jalgaon News : नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं होतं. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींवरील दिल्ली पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध केला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा काँग्रेसचा इशारा दिला आहे. दिल्लीत राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समवेत आंदोलन करत असलेल्या अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांचा देखील सहभाग आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकून ठेवल आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला अटक केली तसेच राहुल गांधी यांना सुद्धा बळजबरीने उचलून नेल्याचे वानखेडे म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिला आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटलांना देखील पोलिसांनी घेतलं ताब्यात
सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि खासदार प्रियांका गांधी यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात अटक करुन नेण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं