Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर हायहोल्टेज ड्रामा, राहुल गांधींना पोलिसांना घेतलं ताब्यात | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

३ तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यास सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. 

News18
News18

नवी दिल्ली :  नीट परीक्षा लिक प्रकरणी दिल्लीमध्ये आंदोलनाला आज नवं वळण मिळालं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. ३ तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यास सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थान गाठल्यामुळे एकच खळबळ उडाली. पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षातील खासदारांनी अडीच तासांपासून ठिय्या मांडला. हाताला बांधून घेत आम्हालाही अटक करा, असं म्हणत राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार प्रियांका गांधी, मलिकार्जुन खरगे, यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार यावेळी उपस्थितीत होते.  तसंच,  राहुल गांधी यांच्या धरणे आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली.

पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींशी दोन-तीन वेळा संवाद साधला.  संसदेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यास धरणे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती आपण राहुल गांधींकडे केल्याचे त्यांनी सांगितलं. पण, त्यानंतर पोलिसांची एंट्री झाली. एका बसमध्ये सगळ्या नेत्यांना बसवण्यात आलं. यावेळी पोलीस आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये झटापट झाली.

मराठी बातम्या/देश/

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर हायहोल्टेज ड्रामा, राहुल गांधींना पोलिसांना घेतलं ताब्यात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *