Last Updated:
फिफा वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यानंतर मिया खलिफाने तब्बल 13.8 कोटी रुपये कमावले आहेत. स्पेनच्या ऐतिहासिक विजयानंतर तिने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.
न्यू जर्सी: फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर 1-0 अशी मात करत जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे स्पेनच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असताना लेबनीज-अमेरिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिच्यासाठीही हा दिवस खास ठरला. स्पेनच्या विजयावर लावलेल्या मोठ्या पैजेमुळे तिने सुमारे 1.65 दशलक्ष अमेरिकी डॉलर (जवळपास 13.8 कोटी रुपये) जिंकले.
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अंतिम सामन्यासाठी मिया खलिफा स्पेनचा युवा स्टार लामिन यामाल याची जर्सी परिधान करून स्टेडियममध्ये उपस्थित होती. सामना संपल्यानंतर तिने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत स्टेडियममधील काही छायाचित्रे शेअर केली. यासोबतच तिने लावलेल्या पैजेची पावती (बेट स्लिप) देखील पोस्ट केली.
तिने 1.65 ऑड्सवर 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे 8.4 कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम स्पेनच्या विजयावर लावली होती. स्पेन विजयी ठरल्यानंतर तिला 1.65 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम मिळाली.
विजयानंतर मिया खलिफाने सोशल मीडियावर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. माझ्या शरीरात स्पॅनिश रक्ताचा एक थेंबही नसला, तरी माझ्या ‘होम कंट्री’ स्पेनवर मला पूर्ण विश्वास होता. या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत तिचे अभिनंदन केले.
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ याने तब्बल 11 अप्रतिम बचाव करत स्पेनला बराच वेळ रोखून धरले. मात्र अतिरिक्त वेळेच्या 106व्या मिनिटाला फेरान टोरेस याने निर्णायक गोल करत स्पेनला 1-0 असा विजय मिळवून दिला. या विजयासह स्पेनने 16 वर्षांनंतर दुसरे फिफा विश्वचषक विजेतेपद पटकावले. विश्वविजेत्या स्पेनला यासाठी सुमारे 51 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी बक्षीस रक्कम मिळाली.
मिया खलिफा ही लेबनीज-अमेरिकन सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिने 2014 आणि 2015 या काळात काही महिन्यांसाठी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले होते. अल्पकाळ या क्षेत्रात काम करूनही ती आजही जगभरात ओळखली जाणारी व्यक्ती आहे.
अडल्ट इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने सोशल मीडिया क्रिएटर, कमेंटेटर आणि इन्फ्लुएंसर म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. तिचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स असून ती विविध क्रीडा स्पर्धा आणि समकालीन विषयांवर नियमितपणे प्रतिक्रिया देत असते.
Mumbai,Maharashtra
Jul 21, 2026 11:55 PM IST
फायनल मॅचच्या रात्री मिया खलिफाने कमावले 13,80,00,000 रुपये; कसे ते स्वत: सांगितले, चक्क व्हिडिओ शेअर केला
