Rahul Gandhi : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे गृहसचिव गोविंद मोहन हे राहुल गांधी यांच्यासोबत बोलण्यासाठी आले होते. मात्र, आता ते दोघेही निघून गेले आहेत. राहुल गांधी आंदोलनावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत.
प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि काँग्रेसचे अनेक खासदार व नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींसोबत उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींशी बोलण्यासाठी आले, पण त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तिथून निघून गेले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि सरन्यायाधीशांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरून सध्या दिल्लीचे राजकारण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 7, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. प्रियांका गांधी आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासोबत राहुल गांधींशी बोलण्यासाठी आले होते. मात्र, आता ते दोघेही निघून गेले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर रात्रभर ठिय्या आंदोलन करतील.
गृहमंत्र्यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे : खासदार जयराम रमेश
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची एक साधी मागणी आहे. आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये ही मागणी केली आहे. आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी संसदेत यावर स्पष्टीकरण द्यावे आणि या विषयावर संसदेत चर्चा व्हावी. लोकशाही आणि आपल्या संविधानाची कशी हत्या केली जात आहे आणि विद्यार्थ्यांचा कसा छळ केला जात आहे, यावर त्यांनी निवेदन द्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही गेल्या 45 दिवसांपासून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत असे जयराम रमेश म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी या सर्वांनी राजीनामा द्यावा : के. सी. वेणुगोपाल
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी या सर्वांनी राजीनामा द्यावा. त्यांनी आपल्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे आणि जेव्हा तरुणांनी उत्तरदायित्वाची मागणी केली, तेव्हा त्यांच्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. जोपर्यंत ते सत्तेत आहेत, तोपर्यंत भारताचे भविष्य धोक्यात आहे. विद्यार्थ्यांच्या रक्तपाताचा हिशोब मागण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी आलो आहोत. तरुणांच्या गुन्ह्यांसाठी दोषी असलेले मोदी सरकार जबाबदारी आणि संसदेतील चर्चेतून सुटू शकत नाही. देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल आणि त्यांच्यावरील क्रूरतेबद्दल नरेंद्र मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असे मत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं