पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वडिलांच्या खुनाचा बदला मुलाने २३ व्या वर्षी घेतल्याची थरारक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ (Pune Crime News) शिंदेवाडी परिसरात खून करून पसार झालेल्या मुलासह साथीदारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राजगड पोलिस ठाण्यातील पथकाने (Pune Crime News) अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल तसेच तीन (Pune Crime News) काडतुसे जप्त करण्यात आली. संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.(Pune Crime News)
मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ), मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कौरी (दोघे रा. पर्वती दर्शन) यांना अटक केली. ११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात देशमुख याच्यावर धरादार शस्त्राने (Pune Crime News) वार करून खून केला होता. राजगड पोलिसांत गुन्हा दाखल होता. आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश यांचा २०२३ मध्ये देशमुखने खून केला होता. मंथनने साथीदारांच्या मदतीने देशमुख याचा खून केल्याची कबुली दिली. आरोपींकडून (Pune Crime News) देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे जप्त करण्यात आली.(Pune Crime News)
Pune Crime News: वडिलांच्या खुनाचा बदला; चौघांना अटक
पुणे–सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात झालेल्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली. मृताचे नाव संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कोरी अशी आहेत.
Pune Crime News: नेमकं काय घडलं?
११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार, मंथन वैद्यच्या वडिलांचा खून संजय देशमुख यांनी केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.(Pune Crime News)