Sandeep Deshpande on Delhi Police lathicharge at Jantar Mantar: दिल्ली पोलिसांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीमार केला. हा लाठीमार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने ज्याप्रमाणे गोळीबार केला तसाच लाठीमार काल दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आंदोलकांवर केला. पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागलं पाहिजे, गुंडांसारखं वागू नये. शेवटी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, सरतेशेवटी ते जनतेला उत्तरदायी आहेत, सरकारला नाही. आधी विरोधात असताना नरेंद्र मोदी (PM Modi) हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सल्ला द्यायचे की, आंदोलकांवर लाठीमार करु नका. मोदींनी आता आपलं तेच भाषण ऐकले पाहिजे. काल दादरमध्येही आंदोलनावेळी पोलिसांनी मुलींचे केस ओढले. आम्ही आंदोलन करायचे नाही का? आता जर आपण हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीत तर आपल्याला पुढची पिढी षंढ म्हणेल, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Delhi Protest news)
आपल्या विद्यार्थ्याशी तुम्ही संवाद साधू शकत नाही. जालियनवाला बागमध्ये ज्या प्रकारे जनरल डायर होता तसा काल विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारे कायर होते. ब्रिटिश लोक गांधीजींशी बोलायला यायचे, हे बोलायला येत नाहीत. विद्यार्थ्यांना आम्ही खरोखर सलाम करतो. हुकूमशाही विरोधात आंदोलन केले, त्यांचे अभिनंदन, सगळी जनता तुमच्यासोबत आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. तसे न होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
Ashwini Bhide BMC: मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त: संदीप देशपांडे
चेंबूरमध्ये दुर्दैवी घटना झाली, चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. तसेच एका व्यक्तीचा गटारात पडून मृत्यू झाला. या घटनांची जबाबदारी मनपाने कोणावरही दिली नाही. पालिकेच्या अहवालात या मृत्यूंसाठी कोणीही जबाबदार नाही, असे म्हटले आहे. उद्या सकाळी 11 वाजता जबाबदारी निश्चित न करणाऱ्या व्यवस्थेविरोधात मनसे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. 11 वर्ष झाली, गार्डन डिपार्टमेंटमध्ये एकाच अधिकारी आहे. आमचा आंदोलन अधिकाऱ्याविरधात नाही, प्रशासनाविरोधात आहे. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला दंड लावला, बाकी कोणाला जबाबदार धरलं नाही. मोदींपेक्षा जास्त इगो हा अश्विनी भिडेंना आहे. आम्ही आयुक्तांना पत्र लिहिलं होतं, त्याचं उत्तर आयुक्तांकडून मिळालं नाही, त्या भेटत नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
आणखी वाचा
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप