Bollywood Actor Struggle Life: 47 वर्षांपूर्वी रिलीज झालेला सिनेमा ‘अंजना सफर’ (Anjaana Safar), शुटिंगवेळी ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत (Veteran actor Biswajeet) आणि अभिनेत्री रेखा (Actress Rekha) यांच्यातील वादग्रस्त ‘किसिंग सीन’वर (Rekha And Biswajeet Kissing Scene) प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी या कृतीला चुकीचं म्हटलंय. या घटनेचा उल्लेख यासेर उस्मान यांच्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ (Rekha: The Untold Story) या चरित्रात करण्यात आला होता, त्यात असा दावा करण्यात आलेला की, त्यावेळी 15 वर्षांच्या असलेल्या रेखा यांना पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेताच, त्यांना किस करण्यात आलं, ज्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना पल्लवी चॅटर्जी म्हणाल्या की, ‘अंजना सफर’मधील तो वादग्रस्त ‘किसिंग सीन’ अयोग्य होता आणि रेखा यांच्या संमतीशिवाय तो घडायलाच नको होता. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, त्यांच्या वडिलांनी एकतर तो सीन करायला नकार द्यायला हवा होता किंवा तो सीन करण्यापूर्वी रेखा यांची परवानगी घ्यायला हवी होती. ती घटना कोणीही घडवून आणली असली तरी ती अयोग्यच होती, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
पल्लवी चॅटर्जी म्हणाल्या की, “ते नक्कीच चुकीचं होतं. माझ्या वडिलांनी ते केलं असो किंवा अन्य कोणी, ते योग्य नव्हतंच. त्यांनी एकतर ते करण्यास नकार द्यायला हवा होता किंवा आधी रेखा यांची संमती घ्यायला हवी होती. त्या यासाठी तयार नव्हत्या आणि साहजिकच, 15-16 वर्षांच्या मुलीसाठी ती बाब धक्कादायक असणारच…” पल्लवी यांनी असंही म्हटलंय की, त्या काळातील दिग्दर्शक अनेकदा कलाकारांकडून नैसर्गिक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सीन्सचा तपशील लपवून ठेवायचे. त्यांनी असा अंदाज व्यक्त केलाय की, तो किसिंग सीन, जे कथितरीत्या अनेक मिनिटं चालला होता, दिग्दर्शकाच्या मंजुरीशिवाय घडणं शक्य नव्हतं.
ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत आणि अभिनेत्री रेखा यांच्यातील त्या सीनचा वाद नेमका काय? (Rekha And Biswajeet Kissing Scene)
‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’त नमूद करण्यात आल्यानुसार, हा किसिंग सीन त्यावेळी शूट करण्यात आलेला, जेव्हा रेखा जवळपास 15 वर्षांच्या होत्या. त्यावेळी अभिनेते बिस्वजीत 32 वर्षांचे होते. मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. त्या विशिष्ट सीनबद्दल अभिनेत्रीला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे तिला मोठा धक्का बसला, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर रेखा यांना अश्रू अनावर झालेले, तसेच हा सिनेमा प्रदर्शित होण्यास तब्बल दहा वर्षांचा विलंब झाला आणि अखेरीस 1979 मध्ये ‘दो शिकारी’ (Do Shikari) या नावानं सिनेमा प्रदर्शित झाला.

पल्लवी यांनी नमूद केलं की, रेखा आणि त्यांचं कुटुंब यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते एकमेकांच्या घरी वारंवार जात-येत असत. या वैयक्तिक संबंधांमुळेच कदाचित या घटनेबाबत रेखा यांना अधिकच मानसिक त्रास झाला असावा, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी हे देखील अधोरेखित केलं की, ही घटना घडलेली असूनही, रेखा यांनी नंतर ‘कहते हैं मुझको राजा’ (Kehte Hain Mujhko Raja) या सिनेमात पुन्हा एकदा बिस्वजीत यांच्यासोबत काम केलं.
कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना, बिस्वजीत यांनी चित्रपट निर्मितीमध्ये हात आजमावला. त्यांनी ‘कहते हैं मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं, पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. आणि या सिनेमानं आपली सर्व कमाई गमावली. अभिनेता अभिनयात परतला, पण काही काळातच त्याची कारकीर्द ढासळली. त्याच्या काही हिट गाण्यांमध्ये ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘तुम्हारी नजर क्यूँ खफा हो गई’, ‘पुकारता चला हूँ मैं’ आणि ‘कहीं दीप जले कहें दिल’, या गाण्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव