TET Exam : टीईटीचा पेपर आग्रा येथील छापखान्यातील कर्मचाऱ्यानं 8000 रुपयांमध्ये फोडला, बुटांच्या इनसोलमधून पेपर बाहेर, धक्कादायक माहिती समोर


ठाणे :  टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा लाखांपेक्षा अधिक शिक्षक उमेदवारांचे भवितव्य अवघ्या आठ हजार रुपयांमध्ये विकल्याची माहिती आहे. आग्रा येथील  गुप्त छापखान्यातल्या कर्मचाऱ्याने प्रश्नपत्रिका बुटाच्या इनसोलमध्ये लपवून बाहेर काढल्याच उघड झालय. नरेश कुमार पुरणचंद माहोर उर्फ निक्की अस या आरोपीच नाव आहे. याच आरोपीने छापखान्यातून पेपर बुटात लपवून बाहेर नेला. पेपर फोडण्यासाठी आठ हजार रुपये आणि भविष्यामध्ये प्लॉट देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे मुख्य सूत्रधाराने हा पेपर 80 हजार रुपयांना विकल्याचही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

टीईटीचा पेपर 8 हजार रुपयांमध्ये विकला

टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर अवघ्या 8 हजार रुपयांत फोडण्यात आला.  आग्रा येथील गुप्त छापखान्यातील कर्मचाऱ्याने प्रश्नपत्रिका बुटाच्या इनसोलमध्ये लपवून बाहेर काढल्याचे उघड झालं आहे. टीईटीचा पेपर फोडणाऱ्या आरोपीचं नाव  नरेश कुमार पुरनचंद माहोर उर्फ निक्की असे आरोपीचे नाव असून त्याने छापखान्यातून पेपर बुटात लपवून आणला होता.  

नरेश कुमारला पेपर फोडण्यासाठी 8 हजार रुपये व भविष्यात प्लॉट देण्याचे कबूल करण्यात आले होते.  त्यानंतर मुख्य सूत्रधाराने हा पेपर 80 हजार रुपयांना विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.  या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अजूनही मुख्य आरोपी बीजेंद्र कुमार गुप्ता व साथीदार सोनू हे फरार आहेत. शिक्षण यंत्रणेचा सुरक्षा भेदून काढत टीइटी पेपर फोडण्यात ही टोळी यशस्वी झाली होती.मात्र भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

टीईटी परीक्षा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून 28 जूनला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, भिवंडीत पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा लांबवीवर टाकण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा परिषदेकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. टीईटी परीक्षा देणाऱ्यांचं लक्ष टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेकडे लागून राहिलं आहे.   

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *