Last Updated:
आरोग्याची काळजी घेणारे अनेकजण जेवणाआधी सॅलड खाण्याला प्राधान्य देतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते, पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, असे मानले जाते.
छत्रपती संभाजीनगर : आरोग्याची काळजी घेणारे अनेकजण जेवणाआधी सॅलड खाण्याला प्राधान्य देतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते, पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, असे मानले जाते. मात्र, जेवणाआधी सॅलड खाणे प्रत्येकासाठी योग्य आहे का? ते कोणत्या प्रमाणात आणि कशा पद्धतीने खावे? याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याच विषयावर आहार तज्ज्ञ सुचेता पाठक यांनी माहिती दिलेली आहे.
ज्या लोकांना पोट गच्च होण्याचा त्रास आहे अशा लोकांनी जेवणाअगोदर सॅलड खाऊ नये. अशा लोकांनी जेवणाच्यामध्ये थोडे थोडे सॅलड खावे. जेवणानंतर अजिबात खायचे नाही. आपल्या भारतीय पद्धतीने सरळ आपण जी कोशिंबीर करतो म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर टाकून त्यामध्ये थोडंसं दाण्यांचा कूट आणि दही टाकून त्यावरती फोडणी टाकतो असं जर करून खाल्लं तर ते जास्त फायदेशीर ठरतं.
नुसतं कसं गाजर, काकडी, टोमॅटो खाण्यापेक्षा थोडं त्याला फ्लेवर देऊन खाल्लं तर अजून फायदेशीर ठरतं. त्यामुळे थोडंसं फॅट शरीरात जातं. पचायला सुद्धा सोपं जातं. सॅलड पेक्षा तुम्ही कोशिंबीर, रायता असं जर खाल्लं तर फायदेशीर आहे. जेवणाच्या अगोदर सॅलड खायचं असेल तर अगदी प्रमाणात खावं. लोकांना पोट गच्च वाटणे किंवा पोट फुगण्यासारखं वाटत असेल त्यांनी जेवणाअगोदर सॅलड खाऊ नये. अशा लोकांनी फक्त दिवसभर नुसतं सॅलड खाऊ नये.
आपण दिवसभर नुसतं सॅलड खाल्लं तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे आपल्या शरीरामध्ये जात नाही. दिवसभर फक्त सॅलडवर राहणे किंवा भाज्या खाणे हे योग्य नाही. प्रथिने खूप आवश्यक असतात ते आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी सॅलड खायचं असेल तर ते जेवणाच्यामध्ये मध्ये खावं पण जेवणानंतर अजिबात खाऊ नये आणि जेवायच्या अगोदर एकदम कमी प्रमाणामध्ये खावं, असं सुचेता पाठक सांगतात.
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra