Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं,


Vinayak Raut Gitesh Raut Girija Raut: शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) हे सध्या वेगळ्या कारणांसाठी सध्या अडचणीत आले आहे. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊतसह पती आणि कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे.  त्यानंतर राऊत कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार असून 23 जुलैपर्यंत विनायक राऊत, गितेश राऊत (Gitesh Raut) यांची चौकशी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढणायत आल्याची माहिती आहे.

Vinayak Raut: विनायक राऊत यांनी पत्रव्यवहार केला, पण मागणी अमान्य करत संरक्षण पुन्हा देण्यास नकार

माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. संरक्षण शाखा-1 कडून पत्राद्वारे संरक्षण मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 30 मे रोजी सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती करत विनायक राऊत यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला होता. अशातच, संरक्षण शाखा-1 ने त्यांची मागणी अमान्य करत संरक्षण पुन्हा देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संरक्षण काढण्यात आल्याने या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Police : कापूरबावडी पोलिसांची दोन पथकं कोकणात दाखल

अशातच विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या आरोप प्रकरणानंतर कापूरबावडी पोलिसांची दोन पथकं कोकणात दाखल झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला असून एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. तर इतर तीन ठिकाणी ज्या ठिकाणी पिडीत महिलेला जादूटोण्यासाठी नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी पोलीस आता जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या ठिकाणीही आपल्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप पिडीतेने तक्रारीत केला होता. त्यानंतर आता पोलीस यंत्रणा त्या दिशेने तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *