CSK Head Coach Update : IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?


Stephen Fleming steps down as CSK head coach : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईला तब्बल 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारे त्यांचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी चेन्नईची तब्बल दोन दशकांची साथ अखेर सुटली आहे. चेन्नई सुपर किंग्सने फ्लेमिंग यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले असून, आता त्यांच्या जागी एका नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. फ्लेमिंग यांची जागा घेण्यासाठी भारताचा माजी फलंदाज हेमंत बदानी (Hemang Badani) याच्या नावाचा प्रामुख्याने विचार केला जात आहे.

स्टीफन फ्लेमिंग यांच्या युगाचा अंत

स्टीफन फ्लेमिंग हे 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात खेळाडू म्हणून चेन्नई संघात सामील झाले होते आणि त्यानंतर 2009 पासून ते संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने 11 वेळा फायनल गाठली (10 आयपीएल आणि 1 चॅम्पियन्स लीग) आणि एकूण 6 जेतेपदे (5 आयपीएल आणि 1 चॅम्पियन्स लीग) पटकावली.

का घेण्यात आला हा मोठा निर्णय?

गेल्या काही वर्षांतील चेन्नई सुपर किंग्सची आणि फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखालील इतर परदेशी संघांची सुमार कामगिरी या निर्णयामागे मुख्य कारण ठरली आहे. 2024 मध्ये चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतरच्या पुढील दोन हंगामात (2025 आणि 2026) तर चेन्नईची कामगिरी अत्यंत खालावली आणि संघ अनुक्रमे 10 व्या आणि आठव्या क्रमांकावर राहिला.

फ्लेमिंग हे दक्षिण आफ्रिकेच्या SA20 मध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि अमेरिकेच्या MLC मध्ये टेक्सास सुपर किंग्सचेही प्रशिक्षक आहेत. जोहान्सबर्ग संघ गेल्या तिन्ही हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला पण फायनल गाठू शकला नाही. तर टेक्सास सुपर किंग्सचा संघ चालू हंगामात 10 सामन्यांत केवळ 3 विजय मिळवून सर्वात शेवटी राहिला. या सततच्या खराब कामगिरीमुळे चेन्नईच्या व्यवस्थापनाने अखेर हा कठोर निर्णय घेतला आहे. सध्या चेन्नईचे वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत असून, ते गेल्या काही हंगामातील कामगिरीची समीक्षा करत आहेत.

फ्लेमिंग यांची जागा कोण घेणार? हेमंत बदानी रेसमध्ये आघाडीवर

स्टीफन फ्लेमिंग यांच्यानंतर चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा कोणाकडे जाणार, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचा माजी क्रिकेटपटू हेमंत बदानी या शर्यतीत सर्वात पुढे आहे. बदानी गेल्या दोन हंगामात (2025 आणि 2026) दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान पटकावले होते, तर पहिल्या हंगामात दिल्लीचे प्लेऑफचे तिकीट अगदी थोडक्यात हुकले होते.

हे ही वाचा –

Stephen Fleming CSK IPL : 17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *