Nirmiti Sawant Doughter Meet: मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) कायमच सिनेमा, नाटक, मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. अनेकदा त्यांनी सासूच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांना कायमच आपल्या वाटतात पण खऱ्या आयुष्यात त्या सुनेसोबत कशा आहेत याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली सून पूर्वा सावंतबद्दल (Purva Sawant) मोकळेपणाने सांगितलं. त्यांचा मुलगा अभिनय सावंत (Abhinay Sawant) आणि सुनेच्या लव्ह स्टोरीचा एक किस्सा सांगितलाय. आदेश बांदेकरांच्या दांडियामध्ये लेकाची आणि सुनेची पहिली भेट झाल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या या मुलाखतीची सध्या चर्चा आहे.
काय म्हणाल्या निर्मिती सावंत ?
‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी त्यांचा मुलगा अभिनय सावंत आणि सून पूर्वा यांची पहिली भेट आदेश बांदेकरांच्या लोकप्रिय दांडिया कार्यक्रमात झाल्याचे सांगितलं. त्या म्हणाल्या ‘पूर्वी आदेश बांदेकर यांचा दांडिया खूप फॉर्ममध्ये होता. कामगार केंद्रामध्ये तो असायचा. मी तिथे ‘जाऊ बाई जोरात’ या माझ्या नाटकाच्या टीमसोबत गेले होते.माझा मुलगाही माझ्यासोबत होता. त्याला नाचायला खूप आवडतं. दांडिया असल्यामुळे नऊ दिवसांमध्ये दर दिवशी एक बेस्ट डान्सर काढला जायचा. त्या दिवशीची एक बेस्ट डान्सर ठरली होती. हे सगळे लोक वेगळ्या सर्कलमध्ये नाचत होते. माझा मुलगा त्या सर्कलमध्ये जाऊन नाचून आला. तिथून आल्यावर त्याने मला सांगितलं की, त्यातली एक मुलगी त्याला खूप आवडली आहे. छान दिसते. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे , तिला विचार ‘जाऊ बाई जोरात’ मध्ये काम करशील का? ‘ त्यावर तो म्हणाला की, ‘नाही मम्मा, ती तुझी फॅन आहे.’ मग मी म्हटलं की, ठीक आहे- बघूया आपण. आणि मग बारा वर्षांनी ती माझी सून झाली.’ असं अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या ‘ जिथे एखाद्या मुलाचं आणि मुलीचं बारा वर्षे रिलेशन चालतं तिथे सासू सून असं काय राहणार!ते नातं आलंच नाही.कारण ती बऱ्याचदा घरी यायची, वावरायची. ती माझी मैत्रीण झाली.त्याची मैत्रीण झाली.आणि घरातल्यांची मुलगी झाली.त्यामुळे लग्नानंतर आता मला सासू सारखं वागायचं आहे,असं कधीच जाणवलं नाही.एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत लीप घेतात तसेच त्या दांडीया नंतर बारा वर्षांनी ती डायरेक्ट माझी सून झाली होती. असं निर्मिती सावंत यांनी सांगितलं.
कोण आहे निर्मिती सावंत यांची सून ?
निर्मिती सावंत यांची सून पूर्वा सावंत फॅशन डिझायनर आहे.अनेक मुलाखतींमध्ये ती निर्मिती सावंत यांचं कौतुक करताना दिसते.सासू न मानता ती त्यांना आईसारखंच किंबहुना मैत्रीण मानत असल्याचं कायम सांगते. शिवाय निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत हा त्यांच्याप्रमाणेच सिनेसृष्टीत कार्यरत आहे.अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तो दिसतो.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव